"आयजीएम'मध्ये नॉन कोविड उपचार सुरू करण्यासाठी प्रयत्न

Attempts To Start Non-Covid Treatment In IGM Hospital Kolhapur Marathi News
Attempts To Start Non-Covid Treatment In IGM Hospital Kolhapur Marathi News

इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. कोरोना काळात आयजीएम रुग्णालयात चांगल्या पद्धतीच्या उपचारामुळे अनेकांनी कोरोनावर मात केली. कोविड रुग्णांची संख्या घटल्याने हे रुग्णालय केवळ कोविडसाठी न ठेवता ते पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरु करावे यासाठी प्रयत्नशील आहोत. येथे केंद्र व राज्य शासनाच्या सर्वच योजना उपलब्ध होणार असल्याने ते सर्वसामान्यांसाठी आरोग्यदायिनी ठरेल, असा विश्‍वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, नॉन कोविड रूग्णांसाठी आयजीएमची दारे खुली व्हावीत याकडे "सकाळ' ने लक्ष वेधले होते. सोमवारी (ता.19) "सकाळ'मध्ये याबाबत वृत्त प्रसिध्द झाले होते. 
मागील साडेतीन महिन्यांपासून शहरात कोरोनाचा कहर होता. या काळात आयजीएम रुग्णालय हे पूर्ण कोविड रुग्णालय केले होते. येथे मिळालेल्या चांगल्या आरोग्यसेवेमुळे अनेकांनी कोरोनावर मात केली. सध्या येथे केवळ 35 रुग्ण दाखल असून त्यामध्ये 19 जण पॉझिटिव्ह तर 2 संशयित रुग्ण असून 14 जण निगेटिव्ह आहेत. त्यामुळे हे रुग्णालय केवळ कोविड रुग्णालय न ठेवता पूर्ववत सर्वच आजारांसाठी सुरु व्हावे या पार्श्‍वभूमीवर आमदार आवाडे यांनी सोमवारी रुग्णालयास भेट देऊन माहिती जाणून घेतली. 

इचलकरंजीसह शिरोळ व हातकणंगले तालुक्‍यासाठी उपयुक्त असे हे रुग्णालय केवळ कोविड रुग्णालय न राहता ते पूर्ववत सुरु करण्यात यावे यासाठी आमदार आवाडे मंगळवारी (ता.20) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. याठिकाणी पूर्वीप्रमाणे सर्वच आजारांवरील उपचार सुरु व्हावेत अशी आग्रही मागणी आहे. त्याचबरोबर न्यायप्रविष्ठ असलेला 42 कर्मचाऱ्यांचा प्रश्‍नही निश्‍चितपणे मार्गी लागेल आणि ते सर्वजण आरोग्यसेवेत रुजू होतील असा विश्‍वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, नगरसेवक सुनिल पाटील, राजू बोंद्रे, संजय केंगार, इम्रान मकानदार आदी उपस्थित होते. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com