कुंपणाच्या वादातून युवकाचा निर्घृण खून

संजय पाटील | Thursday, 1 October 2020

कुंपणाच्या  कारणावरून  दोन्ही कुटुंबामध्ये वाद विकोपाला गेला.

घुणकी (कोल्हापूर)  : हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथे
जमिनीच्या व  घराजवळ असणाऱ्या  कुंपणाच्या वादातून युवकाचा खून झाला. अविनाश सहदेव कांबळे (वय.३५)असे युवकाचे नाव आहे.

तळसंदे येथील भगवान सहदेव कांबळे व शिवाजी रामू कांबळे या चुलत भावामध्ये जमिनीच्या व घराशेजारील कुंपणावरून वाद होता. आज सकाळी कुंपणाच्या  कारणावरून  दोन्ही कुटुंबामध्ये वाद विकोपाला गेला. यावेळी जोरदार मारहाण झाली. या मारहाणीत अविनाशचा मृत्यू झाला.

हेही वाचा- राहुल आवाडेंना महिन्याभरातच पुन्हा कोरोनाची बाधा -

अविनाश कांबळे यांचा तळसंदे येथे वडापाव विक्रीचा व्यवसाय होता. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, आई- वडील असा परिवार आहे. याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात  ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.

संपादन- अर्चना बनगे