कृष्णात खोत यांना गडहिग्लजच्या वाचनालयाचा पुरस्कार

Award To Krishnat Khot From Gadhinglaj Library Kolhapur Marathi News
Award To Krishnat Khot From Gadhinglaj Library Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : येथील पालिकेच्या पूज्य साने गुरूजी सार्वजनिक मोफत वाचनालयातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा आज नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार हेरवाड (ता. शिरोळ) येथील बाबासाहेब नदाफ यांना जाहीर झाला. साने गुरूजी साहित्य पुरस्कार कृष्णात खोत (फुलेवाडी, जि. कोल्हापूर) यांच्या रिंगाण या कादंबरीसाठी तर, पालिका शिक्षण मंडळाच्या काळूमास्तर विद्यालयातील शिक्षिका पुष्पा पाटील यांना साने गुरूजी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

 नदाफ व खोत यांना प्रत्येकी 25 हजार रोख, मानपत्र व शाल-श्रीफळ, तर पाटील यांना रोख 5 हजार, मानपत्र व शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दरवर्षी पूज्य साने गुरूजींच्या जयंतीदिनी या पुरस्कारांचे वितरण केले जाते. पुरस्कार वितरण सोहळा आणि त्या दिवशीचे व्याख्याते निश्‍चित करण्याचे नियोजन सुरू असून दोन दिवसात त्याला अंतिम स्वरूप येईल, असेही कोरी म्हणाल्या. 

नगराध्यक्षा कोरी म्हणाल्या, ""नगरपालिकेच्या साने गुरूजी वाचनालयातर्फे 1978 पासून लोकशिक्षण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी 18 ते 24 डिसेंबर या कालावधीत हा उपक्रम होतो. यावर्षी कोरोना संसर्गामुळे पहिल्यांदाच व्याख्यानमाला खंडीत करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, 2007 पासून साने गुरूजी साहित्य, आदर्श शिक्षक आणि कै. भिकाजीराव मोहिते आदर्श वाचक पुरस्कार तर 2014 पासून सामाजिक चळवळीत काम करणाऱ्यांचा डॉ. दाभोलकर सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरव केला जातो.

पुरस्कार वितरणासाठी प्रमुख पाहुण्यांचे नियोजन सुरू आहे. गतवर्षी हद्दवाढ भागाची निवडणूक आचारसंहितेमुळे पुरस्कार जाहीर करता आलेले नाहीत.'' यावेळी वाचनालय समिती सभापती शशिकला पाटील, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, ग्रंथपाल काकासाहेब भुईंबर आदी उपस्थित होते. 

बागवान, किणी आदर्श वाचक 
नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होवून वाचन संस्कृतीला बळ मिळावे या हेतुने वाचनालयातर्फे दरवर्षी दोन आदर्श वाचकांचा पुरस्काराने गौरव केला जातो. यावर्षी व्यंकटेश किणी (गिजवणे, ता. गडहिंग्लज) आणि मंजूरअहमद बागवान (उत्तूर, ता. आजरा) यांना कै. भिकाजीराव मोहिते आदर्श वाचकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मानपत्र व शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com