esakal | महागावातील कबड्डी स्पर्धेत बाचणीचा संघ विजेता
sakal

बोलून बातमी शोधा

Bachani Team Winner In Mahagaon Kabaddi Competition Kolhapur Marathi News

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने, कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन व कै. केदारी रेडेकर फाऊंडेशन गडहिंग्लज यांच्या सहकार्याने महागाव (ता. गडहिंग्लज) येथे 47 वी कबड्डी स्पर्धा झाली.

महागावातील कबड्डी स्पर्धेत बाचणीचा संघ विजेता

sakal_logo
By
गणेश बुरुड

महागाव : महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने, कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन व कै. केदारी रेडेकर फाऊंडेशन गडहिंग्लज यांच्या सहकार्याने महागाव (ता. गडहिंग्लज) येथे 47 वी कबड्डी स्पर्धा झाली. यातील कुमार व कुमारी गटात जय हनुमान कबड्डी संघ बाचणी संघाने विजेतेपद पटकाले. विजेत्या दोन्ही संघांना केदारी रेडेकर उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांच्या हस्ते चषक देण्यात आले. या वेळी दत्तामामा खराडे, अण्णासाहेब गावडे, सुभाष साईल हे उपस्थित होते. या स्पर्धांचे संयोजन केदारी रेडेकर संस्था समुहातर्फे करण्यात आले.

सदर स्पर्धा दोन दिवस चालल्या होत्या. स्पर्धेत मुलांचे 47 संघ व मुलींचे 15 संघ सहभागी झाले होते. या निवड चाचणीतून कुमार व कुमारी गटातून 40-40 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. जळगाव येथे 5 ते 8 मार्च रोजी होणाऱ्या राज्य अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी पुन्हा कोल्हापूर येथे कुमार व कुमारी गटातून 12-12 खेळाडू निवडून कोल्हापूर जिल्ह्याचे दोन्ही संघ निवडले जाणार आहे. या स्पर्धेसाठी 25 पंच काम करीत होते. स्पर्धा 70 किलो वजनी गटात होती. 

केदारी रेडेकर संस्था समुहाच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश भेंडीगिरी, राष्ट्रीय खेळाडू सुभाष साईल, उपाध्यक्ष भगवान पोवार, पंच प्रमुख अजित पाटील, प्रा. अण्णासाहेब गावडे, शिवाजी विद्यापीठाचे बोर्ड सदस्य. डॉ. बी. एन. कुलपे, स्पर्धा निरीक्षक एम. एन. पाटील, रुपेश जाधव, आशिष मगदूम, प्रकाश मोहिते, संदिप लवटे, शहाजान शेख, शुभदा माने, रवी पाटील, सर्जेराव पाटील, कुबेर पाटील, महेश कोथळकर, के. एस. माने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवाजी कोंडुस्कर, जीवन निकम, राजेंद्र चिगरे, सुनील दासनहट्टी, सुरेश तिळवले यांच्यासह स्थानिक कबड्डी संघाने श्रम घेतले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur