स्वच्छतागृह वापरासाठी महिलांकडून घेतले जातात पैसे 

bad condition for kolhapur st stand toilet
bad condition for kolhapur st stand toilet

कोल्हापूर - प्रवाशांना विविध सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळाने सुलभ इंटरनॅशनल कंपनीद्वारे मध्यवर्ती बसस्थानकावर स्वच्छतागृहाची सेवा दिली आहे. पूर्वी ही सेवा लहान मुले व महिलांसाठी मोफत होती. ती बंद करून सहा महिन्यापासून महिला पुरूषांसह सरसकट सर्वांकडून पाच रूपये आकारले जात आहेत. त्याचा अधिकृत दर फलक स्वच्छतागृहावर लावलेला नाही. स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे पैसे देऊन मनस्ताप वाट्याला येत आहे. 

मध्यवर्ती बसस्थानकावर महिला व पुरूषांसाठी स्वच्छतागृह आहे. बसस्थानकावरील स्वच्छतागृहाच्या वापरासाठी पैसे देऊन सेवा चांगली मिळत नाही तरीही स्थानिकस्तरावर एसटी विभाग कारवाई करीत नाही. सुलभ इंटरनॅशनलचा स्थानिकस्तरावरील व्यवस्थापक भेटत नाही. त्यामुळे रोज बहुतेक महिला, पुरूषांकडून पाच रूपयांची रक्कम वसुली करीत हजारो रूपयांचा गल्ला भरण्याचे काम सुरू आहे. 

या बसस्थानकावर रोज किमान पाच ते दहा हजार लोकांची ये-जा असते. यात प्रवाशांना स्वच्छतागृहाचा वापर गरजेनुसार करण्यासाठी किती पैसे आकारावेत याचे महामंडळाने दर निश्‍चित केलेले आहेत. त्यानुसार स्वच्छतागृह ठेकेदार कंपनीचे काउंटरवर बसलेले लोक पाच रूपये घेतात. यात महिलांसाठी स्वच्छतागृहाची सेवा मोफत होती. जून 2019 ला महामंडळाने परिपत्रक काढले. त्यानुसार महिलांकडून पाच रूपये घेतले जातात. एखाद्या महिलेने याबाबत जाब विचारला तर काउंटरवरील व्यक्ती खेकसून पैसे मागते असा अनुभवही काही महिला सांगतात. 

एका दिवसात जवळपास तिनशे ते पाचशे लोकांकडून स्वच्छतागृहाचा वापर होतो. दिवसभराचा दोन अडीच हजार रूपयांचा किमान महसूल येथे मिळतो. 

असे असतानाही स्वच्छतागृहाच्या वापरासाठी पैसे किती आकारावेत, याचा फलक स्पष्ठपणे स्वच्छतागृहाच्या दर्शनी भागावर लावलेला नाही. कधी भिंतीवर रंगाचे कधी दोन रूपये तर कधी पाच रूपये अशी अक्षरे लिहिली जातात. ति अक्षरे खराब झाली की, नेमके किती पैसे द्यावेत हे निश्‍चितपणे कळत नाही. पैसे देऊन स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी आत गेल्यानंतर अत्यंत गलिच्छ अवस्थेतील स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. यागृहात जाण्यापूर्वी मनाची तयारी करून जावे अशी स्थिती आहे. अशा गलिच्छ सेवेकडे महामंडळाचे दुर्लक्ष असल्याचे दिसते. 

पैसे देऊन मनस्ताप 
एसटी महामंडळ प्रवासी वाढ व महसुल वाढ मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशात एसटीने जाणाऱ्या प्रवाशांना पूरक सुविधा देण्याची जबाबदारी एसटीची आहे. असे असूनही सरसकट सर्वांकडून स्वच्छता गृहासारख्या नैसर्गीक बाबींसाठी पैसे आकारले जातात. पैसे देऊनही सुविधा चांगली दिली जात नाही. याबद्दल प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. 

महिलांचा आदराचा एसटीला विसर 
महिलांविषयी एसटी महामंडळ आदर व्यक्त करीत होते. त्याचाच भाग म्हणून गेल्या वर्षी राज्यातील सर्व बसस्थानकावर स्वच्छतागृहाची सेवा महिलांसाठी मोफत असल्याची उद्घघोषणा केली जात होती. ही उद्धघोषणा सध्या बंद केली. त्यासोबत महिलांकडून स्वच्छता गृह वापरासाठी पैसे आकारणे सुरू केले. 

मध्यवर्ती बसस्थानकावरील स्वच्छतागृहाच्या वापराबाबतचे दर फलक लावणे तसेच स्वच्छतेबाबतही योग्य उपाययोजना राबविण्याबाबत सूचना दिल्या जातील. त्याची अंमलबजावणी होईल.' 
-अजय पाटील, व्यवस्थापक, एसटी मध्यवर्ती बसस्थानक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com