फिट अँड फाईन राहण्यासाठी हवा असा समतोल आहार....

 balance diet to stay fit and fine
balance diet to stay fit and fine

   प्रत्येक सजीवासाठी अन्न हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. शरीराचे पालनपोषण करण्यासाठी अन्नाचे महत्वही मोठे आहे. मुळातच अन्नाचे वर्गीकरण घन, द्रव आणि अर्ध प्रवाही अशा तीन प्रकारांमध्ये होते. पोषक अन्नघटक आपल्या शरीराला उपयुक्त असतात आणि शरीराचे कार्य नीट चालवायला ते मदत करतात. दररोजच्या जेवणातून शरीरात ते योग्य प्रमाणात गेले नाहीत तर आपले आरोग्य बिघडते. आहारामध्ये असेही काही घटक असतात की जे शरीराला कोणत्याही प्रकारचे पोषण देत नाहीत.

अन्नाचे शरीरासाठी मुख्य तीन प्रकारचे कार्य असते. शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणे - अवयवांच्या हालचालीसाठी ऊर्जेची गरज असते, इतकेच नव्हे तर हृदयाचे स्पंदन वा फुप्फुसाचे श्वासोच्छ्वासाचे काम पार पाडण्यासाठीही ऊर्जेचीच आवश्‍यकता असते. पोषक पदार्थांमधील स्निग्ध पदार्थांचा यासाठी सर्वाधिक उपयोग होतो. पेशी निर्मितीचे कार्य - मानवी शरीर अनेक पेशींचे बनलेले असते. शरीराची वाढ होत असताना या पेशी आकाराने वाढतात, तसेच नवीन पेशींची भरही त्यात पडत असते. शरीराच्या पुनर्बांधणीसाठी प्रथिनांची आवश्‍यक्‍यता असते. हे सर्व प्रथिने आपल्याला आपल्या अन्नातूनच मिळतात. संरक्षण आणि नियमन- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्याचे जंतूशी लढाई करणे, संसर्गापासून रक्षण करणे व शरीर तंदुरुस्त राहील याची काळजी घेणे, योग्य नियमन करणे म्हणजे शरीराच्या अनेक क्रिया. उदा. हृदयाचे स्पंदन, स्नायूंचे आकुंचन, शरीराचे तापमान योग्य ठेवणे, रक्त गोठवणे, शरीरात पाण्याचा समतोल ठेवणे या क्रियांचा समावेश होतो. आवश्‍यक प्रमाणातील जीवनसत्वे, खनिजे व प्रथिने शरीराची ही कामे पार पाडत असतात.

आपण खाल्लेल्या अन्नाचा विनियोग असा होत असला तरी तरीही संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. भारतामध्ये प्रांतवार अन्नामध्ये बदल होत राहतो. शिवाय महिला - पुरुष, वय, वजन आणि उंची या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या अन्नग्रहण प्रक्रियेवर होतो. विशेषतः राहणीमान आणि शारीरिक क्षमतेनुसार त्यात फरक पडतो. या सर्वासाठी संतुलित आहाराचा समावेश सर्वाधिक महत्वाचा आहे. यासाठी अन्नघटकांमध्ये उपलब्ध असणाऱ्या क्षमतेनुसार वर्गीकरण केले आहे.

संरक्षण व शरीर नियमन करणारे अन्न 

अनेक जीवनसत्त्वे जसे अ, ब, क, ड, ई, के व खनिजांचे कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, मॅगनीज, तांबे, आयोडीन, सोडियम आणि पोटॅशियम यांचे स्रोत : आहारामध्ये असलेला आणखी एक महत्त्वाचा अन्नघटक म्हणजे फायबर. हा पिष्ठमय पदार्थच आहे. पण त्यांचे पचन होत नसल्यामुळे त्यांना नॉन अव्हेलेबल कार्बोहाइड्रेट असे म्हणतात. आख्खी सालीसकट फळे जसे सफरचंद, संत्रे, द्राक्षे, पेरू, कलिंगड, अंजीर इत्यादी. सालासकट धान्य, कडधान्य व भाज्या इत्यादी. सर्व पालेभाज्या, तोंडली, भेंडी, फ्लॉवर, कोबी, काकडी, टोमॅटो, गाजर यामध्येही फायबर असते. यातील काही प्रकारचे फायबर पोट भरल्याची भावना देतात, ज्यामुळे भूक कमी लागून वजन कमी होण्यास फायदा होतो.

संतुलित आहारात पाण्याला सर्वाधिक महत्त्व

सर्वाधिक महत्वाचे असते ते पाणी. म्हणूनच संतुलित आहारात पाण्याला सर्वाधिक महत्त्व आहे. मानवी शरीरात ७० टक्के पाणी असते. पाणी हे जसे पचनास मदत करते तसेच मल-मूत्र विसर्जनासाठीही अतिशय उपयुक्त आहे. पाण्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते. किमान दोन ते तीन लिटर पाण्याचा रोजच्या आहारामध्ये समावेश असावा. यामध्ये अर्थातच पाण्याबरोबर इतर द्रवपदार्थाचा जसे दूध, ज्यूस, नारळ पाणी, लिंबू पाणी हेदेखील असू शकतात.

  •   ऊर्जा देणारे अन्न - कर्बोदके व स्निग्धता असलेले पदार्थ 
  •  कर्बोदकांचे स्रोत - (धान्य) तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, कंदमुळे - बटाटे, रताळी, सुरण, साखर, गूळ, मध.
  •   स्निग्धता असलेले स्रोत - साय, तूप, लोणी, तेल, वनस्पती तूप, चीज. (दूध व दुग्धजन्य पदार्थ, तेल बिया व मांसाहारी पदार्थ. यामध्येही चरबीचे प्रमाण जास्त असते).
  •   शरीर वाढीचे अन्न - प्रथिनयुक्त स्रोत जसे की दूध व दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, सुकामेवा, तेलबिया, मांसाहारी पदार्थ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com