विद्यार्थ्यांच्या घामाच्या धारांनी भरला बंधारा ; गावकाऱ्यांनी ठोकला सलाम  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bandhara full in kolhapur nanibai chikhali

सात दिवस घाम गाळल्यानंतर सुमारे दोनशे फुट लांब, आठ ते दहा फुट उंच असा बंधारा त्यांनी बांधलेला होता.

विद्यार्थ्यांच्या घामाच्या धारांनी भरला बंधारा ; गावकाऱ्यांनी ठोकला सलाम 

sakal_logo
By
रमजान कराडे

नीबाई चिखली (कोल्हापूर)-  देवचंद महाविद्यालयातील पन्नास स्वयंसेवकांनी सतत सात दिवस परिश्रम घेत फोंड्या माळावर मिनी तलाव साकारला होता. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात आकारास आलेला हा तलाव यंदाच्या पावसाने तुडुंब भरून वाहत आहे. घामाच्या धारांनी बांधलेल्या या बंधाऱ्यात साठलेले पाणी पाहताना गावकरी देखील सुखावले आहेत.

साठलेले हे पाणी पाहताच  गावकऱ्यांनी स्वयंसेवकांच्या कार्याला सलाम केला. 

'जल है तो कल है' विषय घेत अर्जुननगर ( ता.कागल )  येथील देवचंद महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर गलगले येथे गेल्यावर्षी संपन्न झाले होते. शिबिरामध्ये पंचवीस मुले व पंचवीस मुली असे एकूण 50 स्वयंसेवक होते. यावेळी शिबिरार्थींनी गायरानातील कारीचा माळ याठिकाणी जलसंधारणाची गरज ओळखून श्रमदानातून मिनी तलाव साकारण्याचा निर्धार केला होता. 

त्यानुसार प्रकल्प अधिकारी व प्राध्यापक यांच्या सहकार्याने हातात कुदळ, फावडे, पाटी घेत स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. सतत सात दिवस घाम गाळल्यानंतर सुमारे दोनशे फुट लांब, आठ ते दहा फुट उंच असा बंधारा त्यांनी बांधलेला होता. तसेच बंधाऱ्याला लागून असलेला रस्ता देखील मुरूम टाकून तयार करून घेतला होता. 

स्वयंसेवकांचे काम पाहण्यासाठी त्यावेळी अनेकांनी भेटी देखील दिल्या होत्या. यामध्ये शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांची भेट महत्वाची ठरली होती. अशा या मिनी तलावात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठले असून तो तुडुंब भरून वाहत आहे. यामुळे परिसरातील भूजल वाढण्यास मदत होऊन तीन, चार महिने तरी येथे पाणी पहावयास मिळणार आहे. याकामी विजयकुमार पाटील, अर्चना पाटील प्रकाश पाटील, सदानंद झळके, योगेश पाटील, शिवाजी कुंभार, सरपंच कल्पना डावरे, विश्वनाथ पाटील, विलास पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

हे पण वाचा - "चंद्रकांतदादांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला"

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सलग दोन वर्षे गलगले गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेतली होती. अतिशय कमी कालावधीत स्वयंसेवकांच्या श्रमदानातून बंधारा पूर्णत्वास आला. तुडुंब भरलेला बंधारा पाहिल्यानंतर सर्वांच्या कष्टाचे सार्थक झाल्याचे समाधान नक्कीच आहे.

हे पण वाचा  उतारवयात मागे लागली साडेसाती  : वयोवृद्ध खेळाडूंना करावे लागते यासाठी वेटिंग!  
  

प्रा. विजयकुमार पाटील, कार्यक्रम अधिकारी 

संपादन- धनाजी सुर्वे 

loading image
go to top