ब्रेकिंग - कोल्हापुरात घंटागाडी चालकाला हॉकी स्टिक आणि काठ्यांनी बेदम मारहाण

beaten for Driver in Kolhapur
beaten for Driver in Kolhapur

कोल्हापूर - कदम वाडी परिसरात कचरा उठावासाठी गेलेल्या घंटागाडी चालकास स्थानिक नागरिकांनी हॉकी स्टिक आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. जखमी विजय अवघडे या घंटागाडी चालकास सीपीआरमध्ये दाखल केले असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. यानंतर शहरातील बहुतांश घंटागाडी चालक आणि कर्मचाऱ्यांनी सीपीआर समोर येऊन निदर्शने केली.


याबाबत अधिक माहिती, कदम वाडी येथे घंटागाडीवर काम करणारे विजय अवघडे या कर्मचाऱ्याला काही स्थानिक नागरिकांनी काठीने बेदम मारहाण केली. आज सकाळी ही घटना घडली. या घटनेनंतर घंटागाडी वर काम करणारे एकशे चार कर्मचारी एकत्र आले आणि त्यांनी मारहाण करणार्‍यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद राहील असा इशारा दिला. संबंधित चालक हा महापालिकेने नियुक्त केलेल्या डीएम  या कंपनीचा कर्मचारी आहे. पण हा कर्मचारी महापालिकेचे काम करत होता. गाडी पुढे घेण्यावरून काही स्थानिकांशी त्याचा वाद झाला या वादावादीत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com