बेळगावचा संघ फुटबॉलचा विजेता

Belgaum team football champion
Belgaum team football champion

गडहिंग्लज : येथील नेताजी पालकर व्यायाम शाळेतर्फे आयोजित आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेत बेळगाव फुटबॉल क्‍लबने विजेतेपद पटकावले. स्थानिक गडहिंग्लज संयुक्त पेठ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 

अंतिम सामना चुरशीचा झाला. बेळगाव फुटबॉल क्‍लब व गडहिंग्लज संयुक्त पेठ यांच्यातील हा सामना 1-1 अशा बरोबरीत सुटल्याने पेनल्टी स्ट्रोकवर सामन्याचा निर्णय द्यावा लागला. बेळगाव संघाने गडहिंग्लजच्या संयुक्त पेठला पेनल्टीवर 2-1 च्या फरकाने पराभव करून पालकर फुटबॉल चषकावर नाव कोरले. 

नगरसेवक महेश कोरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना बक्षीस वितरण झाले. विजेत्या संघाला 15 हजार रोख व चषक आणि उपविजेत्या संघाला 11 हजार रोख व चषक असे बक्षीस दिले. बेस्ट हाफ मिडफिल्डर म्हणून किरण चोकाशी (बेळगाव), बेस्ट फॉरवर्ड पंकज संकपाळ (बेळगाव), बेस्ट गोलकिपर आदर्श (साई एज्युकेशन), बेस्ट डिफेंडर विशाल पाटील (केबीआर) यांना वैयक्तिक बक्षीसेही देण्यात आली. रोहित सुतार याला स्पर्धेतील बेस्ट प्लेयर तर बेस्ट टीमचा बहुमान भीमनगर संघाला देण्यात आला. 

अंतिम सामन्यात पहिला गोल नोंदवलेला खेळाडू किरण चोकाशी याला पालकर व्यायामशाळेचे सचिव आप्पा शिवणे यांच्यातर्फे 1001 रुपयांचे बक्षीस दिले. यावेळी श्री. कोरी यांचे भाषण झाले. डॉ. रणजित पाटील, प्रा. लता पालकर, नेताजी पालकर, आप्पा शिवणे, सुभाष राऊत, अनिरूद्ध रेडेकर, राजू मकानदार, राजू शेटके, दिलावर अत्तार, चॉंद मुल्ला, विनायक घोडके, सुरेश शेटके, संतोष मांगले, सुरेश दास आदी उपस्थित होते. पंच म्हणून भैरू सलवादे, इम्रान बांदार, किरण कावणेकर, आदित्य रोटे, राकेश परीट, पृथ्वीराज पालकर यांनी काम पाहिले. लता पालकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश दास यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com