अरूण लाड आमदार झाले पण प्रत्येक कुंडलकरांना वाटतेय आपणच आमदार

धनंजय दौंडे | Friday, 4 December 2020

अरूण लाड यांनी आघाडी घेतल्याचे समझताच  कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.

कुंडल (सांगली) : अरूण  लाड आमदार झाले पण आज समस्त कुंडलकरांना वाटतय आपणच आमदार  झालोय. एवढा आनंद आज कुंडलच्या प्रत्येक  घराघरात झाला आहे . 4 डिसेंबर   हा   दिवस   कुंडलकरांसाठी कायमच महत्वपूर्ण असतो . क्रांतिअग्रणी डाॕ. जी.डी.बापू  लाड यांचा हा जन्मदिवस. याचे औचित्य साधून गेली दोन दशके  व्याख्यानमाला व क्रांतिअग्रणी पुरस्काराची परंपरा येथे राबविण्यात येते. स्व.क्रांतिअग्रणी जी.डी.बापू लाड यांच्या जयंती दिवशीच  अरूण लाड आमदार झाले. आजचा हा ऐतिहासिक व आनंदाचा  दिवस कुंडलच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंद होईल. अनेक दशके हा ऐतिहासिक व संस्मरणीय  दिवस म्हणून कुंडलकर नोंद ठेवतील.   
 भाजपचा गड असलेल्या  पुणे पदवीधर मतदारसंघात   हि निवडणूक   जिंकणे  सोपे नव्हते पण  अरूण अण्णांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी  पुणे , सोलापूर ,सातारा , कोल्हापूर , सांगली या जिल्ह्यात मतदार नोंदी पासून ते प्रत्यक्ष मतदान घडविण्यापर्यंत    जिवाचे रान केले. याचमुळे भाजपच्या या बालेकिल्यात अशक्य वाटणारा  विजयी झेंडा मोठ्या मताधिक्याने  लावता आला. हा विजय लाड  यांच्या  कार्यकर्त्यांनी  खेचून आणला असेच म्हणावे लागेल . 

 1957 ला व 1962 ला  क्रांतिअग्रणी जी.डी.बापू लाड यांची  आमदार  म्हणून निवड झाली होती . 1957 ला त्यावेळच्या तासगाव विधानसभा व 1962 ला विधानपरिषदेवर बापूंची निवड झाली होती.   सुमारे 58 वर्षांनी  लाड यांच्या कुटुंबात आमदारकी आल्याने पलूस कडेगाव विधानसभा मतदार संघात  श्री.लाड यांच्या समर्थकात  आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा- मोदींचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्षच; शेतकऱ्यांना अदानी आणि अंबानींचे गुलाम करू नका -

Advertising
Advertising

1962 नंतर क्रांतिअग्रणी बापूंनी पक्षासाठी अनेकवेळा लोकसभा व विधानसभा लढविल्या  .सन 2000 सालापासूनही  प्रत्येकवेळी  विधानसभा निवडणूकीवेळी अरूण लाड यांनी विधानसभेची निवडणूक  लढवावी असा आग्रह त्यांच्या कार्यकर्त्याचा असे. तसेच गेल्या विस वर्षात विधानसभेच्या निवडणुकीत अरूण लाड यांचे नाव सतत चर्चेत येई. पुणे पदवीधर ची 2014 ची निवडणूक लाड यांनी लढविली होती.अपयश आले माञ खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने तयारी केली .अरूण लाड यांच्या साठी  महाविकास आघाडीचे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील  सर्वच पक्षाचे नेते एकदिलाने    एकञितपणे आले . या नव्या  समीकरणाचा   हा संदेश महाविकास आघाडीला आगामी चार वर्षाचा कालावधी पूर्ण पणे करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.  

अरूण  लाड यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांनी हा विजय खेचून आणला . काल पहाटेच अनेक समर्थक  मतमोजणी  स्थळी रवाना झाले होते. सायंकाळी अरूण लाड यांनी आघाडी घेतल्याचे समझताच  कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. बहुसंख्य कार्यकर्ते पुणेला  रवाना झाले होते. लाड पुणेहून दुपारी येणार आहेत कार्यकर्ते त्यांच्या प्रतिक्षेत आहेत.

 संपादन- अर्चना बनगे