हे 'बिस्कीट महादेव मंदिर' तुम्ही पाहिलंय काय ?

Biscuit Mahadev Temple in belgum
Biscuit Mahadev Temple in belgum

बेळगाव - शहर परिसरात अनेक महादेवाची मंदिरे आहेत, मात्र त्यातील एक प्रमुख मंदिर म्हणून कॅम्प येथील शंभू जत्ती मंदिराची ओळख आहे. या मंदिराला बिस्कीट महादेव मंदिर म्हणूनही ओळखले जाते. १८१६ पासून या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग असल्याची माहिती येथील पुजारी सांगतात. मंदिराचा इतिहास २०४ वर्षांचा असून, मंदिर भक्तांसाठी नेहमी खुले असल्याने भक्तांची कायम ये-जा असते.

१९९० साली मंदिराचा जीर्णोद्धार

मंदिराची देखभाल करण्यासाठी शंभू जत्ती मंदिर ट्रस्ट कमिटी कार्यरत आहे. १९६१ साली ट्रस्टची स्थापना करून नोंदणी केली आहे. सध्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी अजित शानभाग, सचिव म्हणून अशोक पै, सुधाकर शानभाग, किरण शानभाग, नारायण पै, वरद शानभाग आहेत. १८१६ पासून याठिकाणी छोटे शिवलिंग होते. १९६९ मध्ये गोकर्ण मठाचे स्वामी द्वारकानाथ तीर्थ स्मामींनी गौड सारस्वत ब्राह्मण व शहरवासीयांकडून मोठ्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. १९९० साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिरात दोन शिवपिंड्या असून एक पिंडी १० इंच व दुसरी २७ इंच आहे. सुमारे तीस गुंठ्यांत मंदिर व प्रार्थना सभागृह आहे. मंदिरात श्रावण महिन्यात व शिवरात्रीत विशेष पूजा केली जाते. महाशिवरात्रीला ऊस, दही, दुधाचा अभिषेक घालण्यात येत असून सुमारे १ हजारहून अधिक भाविक दर्शन घेतात. मंदिरात रोज सायंकाळी ४ ते ५.३० पर्यंत श्री हरिमंदिरातील कलावती आईच्या भक्तांचे भजन होते.

म्हणून म्हणतात बिस्कीट महादेव मंदिर

या मंदिरामध्ये यापूर्वी केशव भट, व्यंकटरमन भट यांनी पूजारी म्हणून सेवा केली आहे. सध्या रवींद्र भट व गुरुप्रसाद भट पूजा करतात. मंदिर आवारात उद्यान व जांबोटकरांची बेकरी होती. या बेकरीतील बिस्कीट या मंदिरात नवैद्य म्हणून ठेवले जात होते. यावरून या मंदिराला बिस्कीट महादेव असे नाव पडले असल्याचे येथील पुजारी सांगतात. 

१९६१ साली मंदिर ट्रस्टची स्थापना केली आहे. मंदिर व प्रार्थना सभागृहाची सुमारे ३० गुंठे जागा आहे. रोज विविध धार्मिक विधी होतात. महाशिवरात्री व श्रावण महिन्यातील कार्यक्रम विशेष असतात. या मंदिराच्या नावावरून वेगळेपण वाटते. 
-अजित शानभाग, अध्यक्ष, शंभु जत्ती मंदिर ट्रस्ट
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com