उद्योगांना हवा सवलतींचा बुस्टर डोस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

कोल्हापूर : उद्यमनगरी म्हणून असलेल्या कोल्हापूर शहरात जितका कर औद्योगिक वसाहतीतून जमा होतो, तितकाही खर्च येथे होत नाही. माहिती तंत्रज्ञान अर्थात आय.टी पार्क येथे होत नाही. जोपर्यंत औद्योगिक वसाहतीतील सुविधा मिळत नाहीत, जागतिक बदलाप्रमाणे बदल केला नाही तर उद्यमशीलता निघून जाईल, हा धोका आहे. महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात उद्योगांना सवलतींचा बुस्टर डोस मिळाला पाहिजे. 

कोल्हापूर : उद्यमनगरी म्हणून असलेल्या कोल्हापूर शहरात जितका कर औद्योगिक वसाहतीतून जमा होतो, तितकाही खर्च येथे होत नाही. माहिती तंत्रज्ञान अर्थात आय.टी पार्क येथे होत नाही. जोपर्यंत औद्योगिक वसाहतीतील सुविधा मिळत नाहीत, जागतिक बदलाप्रमाणे बदल केला नाही तर उद्यमशीलता निघून जाईल, हा धोका आहे. महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात उद्योगांना सवलतींचा बुस्टर डोस मिळाला पाहिजे. 

उद्यमनगरासह इतर व्यापार उद्योगांना चालना देणारा अर्थसंकल्प महापालिकेने सादर करावा, प्रत्यक्षात शहरातील औद्योगिक वसाहतीतून परदेशात वेगवेगळे सुटे भाग पाठविले जातात. तरीही अपेक्षीत सुधारणा येथे होत नाही. शिवाजी उद्यमनगर अधिक महसूल देणारा प्रभाग आहे. 

तरीही याच प्रभागात सर्वात जास्त सुविधांची वानवा आहे. येथे अपेक्षीत सुधारणा होत नाही. रस्ते दर्जेदार नाहीत. पाणी आणि शौचालयाची व्यवस्था चांगली नाही. 
शहरात आय.टी.पार्क उभारले तरच उद्यमशीलतेला चालना मिळणार आहे. गेली आठ-दहा वर्षे आयटी पार्कचा विषय केवळ चर्चेत आहे. महापालिकेने जागा देण्यासाठीचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रत्यक्षात ती जागा दिलेली नाही. आज अनेक तरुण नोकरीसाठी उद्यमनगरात फिरतात. त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी उद्योग वाढले पाहिजेत. त्यासाठीच महापालिकेच्या अर्थसंकल्प उद्योगांना चालणारा असला पाहिजे. 

उद्यमनगराला आवश्‍यक त्या सुविधा दिल्या पाहिजेत. उद्योग वाढल्यास अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. त्यातून कळत न कळत एक एक संसार उभे राहण्यास मदत होईल. त्यामुळे यंदाचा महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्योगांना बुस्टर देणारा असला पाहिजे. उद्योजकांना सुविधा देऊन उद्यमशीलतेला हात द्यावा. 
- संगिता नलवडे, संचालक ः उद्यम को-ऑपरेटीव्ह सोसायटी. 

कोल्हापुरात लवकरात लवकर आयटी पार्क उभारला पाहिजे. स्थानिक उद्योगांना सेवा देणारे आय टी उद्योग कोल्हापुरात बहुसंख्येने आहेत. 
या उद्योगांना सवलती देवून सक्षम बनविल्यास येथील आयटी सेक्‍टरला उभारी मिळेल. याकडे महापालिकेने अर्थसंकल्पात गांभिर्याने पाहिल्यास बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. 
- विनय गुप्ते , माजी अध्यक्ष आय.टी.असोसिएशन. 

*आपल्या अपेक्षा व्यक्त करा 
*या व्हॉटस्‌अप क्रमाकांवर-9822907046(डॅनियल काळे).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Booster dose of air discounts to industries