मुलगाच हवा म्हणून घर विकण्याचा लावला तगादा

ओंकार धर्माधिकारी
Tuesday, 15 September 2020

मुलगा होत नाही म्हणून विवाहितेला मारहाण आणि शिविगाळ करणाऱ्या कुटुंबीयांवर आज गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद सुनीता विजय वाघमारे (वय 28, गणेश नगर, शिंगणापूर, ता. करवीर) यांनी दिली आहे.

कोल्हापूर ः मुलगा होत नाही म्हणून विवाहितेला मारहाण आणि शिविगाळ करणाऱ्या कुटुंबीयांवर आज गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद सुनीता विजय वाघमारे (वय 28, गणेश नगर, शिंगणापूर, ता. करवीर) यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता यांचा विवाह विजय श्रीमंत वाघमारे याच्याशी झाला. सुनीता यांना मुलगा होत नाही म्हणून पतीसह सासू, सासरे, दीर, भावजय मारहाण व शिविगाळ करत होते. तसेच सुनीता यांच्या आईच्या नावावर असणारे घर विकून पैसे आणून दे किंवा त्या पैशांनी दवाखान्याचा खर्च आम्हाला मुलगा दे असे सांगत होते. त्यामुळे त्यांनी सुनीता यांना सासरी नेले नव्हते. याबाबत आज सुनिता यांनी करवीर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पतीसह लक्ष्मी श्रीमंत वाघमारे, श्रीमंत मारुती वाघमारे, रवी श्रीमंत वाघमारे, रेणुका रवी वाघमारे (गणेश नगर, शिंगणापूर, ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

संपादन ः रंगराव हिर्डेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The boy wants to sell the house