रूग्ण सापडला, बसस्थानक परिसर केला "कंटेन्मेंट झोन' 

bus stand area "containment zone"
bus stand area "containment zone"

जयसिंगपूर : शहरातील बसस्थानक कंटेन्मेंट झोनखाली असल्याने तीन दिवसांपासून बसस्थानकावर एकही एस. टी. धावू शकलेली नाही. कोल्हापूर, इचलकरंजी आणि कुरुंदवाड आदी प्रमुख मार्गावर सुरु असणारी एस. टी. सेवा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय सुरु आहे. मात्र, पालिकेने ग्रीन सिग्नल दिल्यास शहरातून बससेवा सुरु होणे शक्‍य होणार आहे. यामुळे दररोजच्या 1800 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. 

शहरातील दहाव्या गल्लीतील ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली. यानंतर त्याठिकाणापासून शंभर मीटर परिसराला प्रतिबंधीत केले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. यानंतर पुन्हा दोन बाधीत सापडल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. दहाव्या गल्लीतील रुग्णामुळे बसस्थानक परिसरही प्रतिबंधीत झाल्याने तीन दिवसापासून एकही एस.टी. बसस्थानकात आली नाही. 

कुरुंदवाड आणि शिरोळमध्येही कोरोनाचे रुग्ण सापडल्याने याठिकाणीही उपाययोजना राबवल्या आहेत. शिरोळमध्येही जनता कर्फ्यु लागू केला आहे. अशीच काहीशी स्थिती कुरुंदवाडची आहे. त्यामुळे कुरुंदवाड आगाराच्या गाड्या शिरोळमार्गे जयसिंगपूरपर्यंत धावू शकल्या नाहीत. पाचव्या टप्प्यातील लॉकडाउननंतर जयसिंगपूर बसस्थानकातून कोल्हापूर, इचलकरंजी आणि कुरुंदवाड या प्रमुख मार्गावर वाहतूक सुरु होती. मात्र, दहाव्या गल्लीत रुग्ण सापडल्याने बसस्थानकच कंटेन्मेंट झोनखाली आल्याने ही स्थिती उद्‌भवली आहे. 

जयसिंगपूर-शिरोळ मार्गावर सर्वाधिक खासगी प्रवासी वाहतूक होत असते. मात्र, लॉकडाउनमध्ये ही वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे नोकरदारांसह सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय झाली आहे. तीन महिन्यापासून लॉकडाउनमुळे कुरुंदवाड, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगलीसह कर्नाटक राज्यातील एस. टी. आगाराचे आर्थिक नुकसान झाले आहे. 
लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यानंतर हळूहळू सुरु झालेली एस. टी. वाहतूक पुन्हा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुरुवातीला केवळ एकच प्रवासी घेऊन बसस्थानकातून एस. टी. कोल्हापूरकडे रवाना झाली होती. आता पूर्णपणे वाहतूक ठप्प आहे. 

खबरदारी घेत परवानगी हवी... 
सांगलीहून कोल्हापूर, इचलकरंजीच्या दिशेने जाणाऱ्या अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांचा वापर प्रवाशांकडून केला जात आहे. मात्र, ही वाहतूक धोक्‍याची बनू शकते. त्यामुळे नगरपालिकेने प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन पुरेशी खबरदारी घेत एस. टी. वाहतुकीला परवानगी देण्याची मागणी होत आहे. 

दृष्टिक्षेप
- दहाव्या गल्लीतील रुग्ण सापडल्याने बसस्थानक परिसर सील 
- तीन दिवसांपासून एकही एसटी धावली नाही 
- प्रवाशांची मोठी गैरसोय 
- पालिकेने सिग्नल दिल्यास वाहतूक सुरू होणे शक्‍य 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com