- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- कोरोना
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- अर्थसंकल्प
- आणखी..
- धन की बात
- अर्थसंकल्प
- जॉब नौकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- सप्तरंग
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- राशी भविष्य
- संपादकीय
- सायन्स टेकनॉलॉजि
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- एज्युकेशन जॉब्स
- श्री गणेशा २०२०

बंदला पाठिंबा देण्यासाठी आज शहरातील सराफ कट्टा 100 टक्के बंद राहिला.

कोल्हापूर : जीएसटीच्या जाचक अटीला विरोध करण्यासाठी आज देशभरात व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. या बंदला कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी बंद पाळण्यात आला तर काही ठिकाणी व्यवहार सुरळीत सुरु होते. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या महाद्वार रोड, चप्पल लाईन, राजारामपुरी, शाहूपुरी येथील बहुतांश दुकाने बंद होती. मात्र काहींनी दुकाने सुरू ठेवल्यामुळे बंद 100 टक्के यशस्वी होऊ शकला नाही.
दरम्यान कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तसेच राज्य आणि केंद्र शासनाच्या जीएसटी विभागातील कार्यालयांना निवेदन सादर केले आहे. आणि जाचक अटी मागे घेण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा - कोल्हापूर : सेनापती कापशीत आलेल्या त्या टस्कराची ओळख पटली ; नाव आलं समोर -
बंदला पाठिंबा देण्यासाठी आज शहरातील सराफ कट्टा 100 टक्के बंद राहिला. काही कापड व्यावसायिकांनी बंदचे आवाहन धुडकावून लावले. शहरातील होलसेल धान्य बाजारपेठ मात्र बंद राहिली. तरीही किरकोळ विक्रेत्यांनी व्यवहार सुरू ठेवल्याने बंद शंभर टक्के यशस्वी झाला नाही. मात्र शहरात बंद सदृश्य वातावरण मात्र राहिले. कोल्हापूर जिल्हा लोरी ऑपरेटर असोसिएशनेही बंदला पाठिंबा दिल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे दोनशेहून अधिक ट्रान्सपोर्ट कार्यालय बंद राहिली. आज कोणतीही मालवाहतूक झालेली नाही.
संपादन - स्नेहल कदम
