बसला विजेचा जोरात धक्का अन् जागेवरच झाला त्यांचा मृत्यू ...

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 23 मे 2020

वसंत पाटील हे सकाळी सहा वाजता घरी एकटेच होते. पत्नी डेअरीला दुध घालण्यासाठी व मुलगा व्यायामासाठी गेला होता.

म्हाकवे (कोल्हापूर) : पिंपळगाव  बुद्रुक (ता.कागल) येथील
वसंत सोनबा पाटील (वय ४५) यांचा घरातील पाण्याची विद्युत मोटर सुरु करतांना विजेच्या धक्याने मृत्यू  झाला. 

वसंत पाटील हे सकाळी सहा वाजता घरी एकटेच होते. पत्नी डेअरीला दुध घालण्यासाठी व मुलगा व्यायामासाठी गेला होता. त्यामुळे ते घरात एकटेच होते. घरातील विद्युत मोटार चालू करत आसतांना त्यांना विजेचा धक्का लागला. या धक्याने ते खाली पडले. त्यावेळी त्यांच्या हातात वायर होती. पत्नीने घरी येवून पाहीले आणी वीज प्रवाह बंद केला.  

हेही वाचा- ब्रेकिंग -  सिंधुदुर्गात सापडले आठ कोरोना पॉझिटिव्ह..

शेजारील नागरीकांनी त्यांना तेथील सरकारी रुग्णालयात नेले आसता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यांच्या मागे  एक मुलागा, पत्नी, दोन विवाहीत मुली असा परीवार आहे. कष्ट करून संसाराचा गाडा हाकणार्या वंसत पाटील यांच्या मृत्युने पिंपळगाव बू॥ येथील पंच क्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case by electric shock in mhakave