पन्‍हाळ्यावर "राजाच्‍या झोपडी"त बिबट्यासह रानडुकरांचा वावर 

cattle with leopards on panhala fort
cattle with leopards on panhala fort

पन्‍हाळा - पन्‍हाळगडावरील वाघदरवाजा जवळ डॉ. राज होळकर यांची" राजाची  झोपडी." या नावाचे  निवासस्‍थान आहे. या परिसरात गुरुवारी रात्री अगोदर रानडुकरांचा कळप तर पहाटे पूर्ण वाढ झालेला बिबट्या कुत्र्याच्‍या वासाने  येवून गेला. एकाच रात्री येवून गेलेल्‍या या दोन्‍ही प्रण्यांची छायाचित्रे त्‍यांनी लावलेल्‍या सीसी टीव्‍ही कॅमेरात कैद झाली आहेत.

डॉ. होळकर यांचे निवासस्‍थान वस्‍तीच्‍या बाहेर तबक उद्यानावरील वाघदरवाजा शेजारी आहे. हा परिसर विस्‍तीर्ण असून यात झाडे झुडपे  बरीच आहेत. डॉक्‍टर निसर्गमित्र असल्‍याने त्‍यांनी आपल्‍या परिसरात झाडे झुडपे वाढू दिली आहेत. त्‍यातच त्‍यांना कुत्री बाळगायची हौसही आहे. साहजिकच तबक उद्यानाशेजारील राजदिंडी परिसरातील जंगलातून त्‍यांच्‍या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असतो. बुधवारी रात्री साडेअकराच्‍या दरम्‍यान त्‍यांच्‍या परिसरात डुकरांचा कळप आला आणि गेटजवळील फणसाच्‍या झाडाखाली विसावला. एकापाठोपाठ एक अशी दहा ते बारा डुकरे आली  आणि गवतात हैदोस घालून निघून गेली. पहाटे सव्‍वापाचच्‍या दरम्‍यान त्‍यांच्‍या व्‍हरांडयात पूर्ण वाढ झालेला बिबट्या आला आणि तटाकडील बाजूस व्‍हरांड्यात बसलेल्‍या कुत्र्यावर  झडप घालण्‍याचा प्रयत्‍न केला. कुत्र्यांच्‍या दबक्‍या आवाजातील ओरडण्‍याने डॉक्‍टर जागे झाले आणि दरवाजा उघडून बाहेर आले तर बिबट्यासद्रुश्‍य प्राणी कठड्यावरून उडी मारून जात असलेला त्‍यांना दिसले.

सकाळी त्‍यांनी सीसी टीव्‍ही फुटेज पाहिले असता त्‍यांना डुकरांच्‍या कळपासह दबकत दबकत आलेला बिबट्या, त्‍याचे चकाकणारे डोळे आणि दार उघडून डॉक्‍टरांनी  केलेल्‍या आरडा-ओरड्यामुळे पळून जाणारा बिबट्या दिसला. आज सकाळी  वनरक्षक के. बी. बादरे आणि  मजूर रंगा उदाळे यांनी हे फुटेज पाहून तो पूर्ण वाढ झालेला बिबट्याच असलेचे सांगतले.


पन्‍हाळागडाभोवती रानडुकरे, गवे आणि बिबट्यासह  मोरांची संख्‍या भरपूर वाढली असून गेल्‍याच आठवड्यात राजदिंडी परिसरात बिबट्याने वानर मारलेचे आढळून आले तर रेडेघाटीच्‍या बाजूस बिबट्याने डुकराला मारून  त्‍याला ओढत नेल्‍याच्‍या खुणा चिखलात उमटलेल्‍या आढळल्‍या होत्या. परिसरातील गवे तर आता माणसाळल्‍यासारखे झाले असून पावनगडावरील लोकांना दुचाकीवरून जाताना गव्‍यांचा कळप नेहमी आढळतो. रस्‍त्‍यावर गवे आले की मोटरसायकल थांबवायची, हेडलाईट बंद करून इंडिकेटर तेवढा चालू ठेवायचा, गवे मोटरसायकलकडे निरखून पाहतात आणि आपल्‍याला धोका नाही हे पाहून रस्‍त्‍यावरून बाजूला होतात व मोटरसायकलस्‍वार निघून जातो. 

मी वनमित्र असल्‍याने रानटी प्राण्‍यांचे मला काहीच वाटत नाही. आजपर्यंत आपल्‍याकडील 21 कुत्री बिबट्याने पळवली आहेत. जंगलात खाद्य मिळाले नाही की तो परिसरात येतो आणि कुत्री पळवायचा प्रयत्‍न करतो. माकडे, डुकरे यांच्‍यासाठी झाडावर लागलेले फणस तसेच ठेवलेले आहेत. हे येतात आणि फणस खावून जातात. परिसरात अजगरही आहेत. पण त्‍याची भीती मला व पत्‍नी नीता हिला अजिबात वाटत नाही.

-डॉ. राज होळकर
 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com