"या' शहरात केंद्रीय प्रवेश प्रक्रिया यंदा ऑनलाईन; दहावीची मूळ गुणपत्रके मिळाल्यानंतर होणार सुरवात

Central Admission Process In Gadhinglaj City Online This year Kolhapur Marathi News
Central Admission Process In Gadhinglaj City Online This year Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : अकरावी विज्ञान शाखेसाठी राबविली जाणारी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया यंदा ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या धोक्‍यापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रवेश अर्ज करता येणार आहे. दहावीची मूळ गुणपत्रके मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर सलग दहा दिवस प्रवेश प्रक्रिया चालणार आहे. 

गडहिंग्लजमधील कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या तीन वर्षांपासून अकरावी विज्ञान शाखेसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यंदाही हीच पद्धत कायम ठेवण्याचा निर्णय कनिष्ठ महाविद्यालयांसोबतच्या बैठकीत घेतला. दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे अकरावी विज्ञान शाखेची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कधीपासून राबविली जाणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले होते. 

कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी यंदा ऑनलाईन पद्धतीने केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट दिली जाणार आहे. त्यावर अर्ज भरण्याचा नमुना उपलब्ध आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचा आहे. आवश्‍यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. प्रवेश शुल्क भरण्यासाठी बॅंक खाते उपलब्ध करुन दिले आहे. शिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी व्हिडीओही उपलब्ध केला आहे. महाविद्यालयांची प्रवेश क्षमतेसह माहितीही देण्यात आली आहे. 

दरम्यान, दहावीची मूळ गुणपत्रके मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर सलग दहा दिवस प्रवेश प्रक्रिया चालणार आहे. त्याबाबतचे सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. सदर प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी, असे आवाहन प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा अकरावी विज्ञान केंद्रीय प्रवेश समितीचे सचिव एन. बी. हलबागोळ यांनी केले आहे. 

दृष्टिक्षेपात आकडे... 
- कनिष्ठ महाविद्यालय संख्या.......10 
- अनुदानित तुकड्या.................. 6 
- विनाअनुदानित तुकड्या............13 
- अनुदानित प्रवेश क्षमता............520 
- विनाअनुदानित प्रवेश क्षमता.....1140 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com