कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता ; राजाराम बंधारा पाण्याखाली...

Chance of heavy rains in Kolhapur district
Chance of heavy rains in Kolhapur district

कोल्हापूर - जिल्ह्यात आज गगनबावडा, राधानगरी, करवीर तालुक्‍यात मध्यम तर इतर ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. दरम्यान, पंगगंगा नदीवरील राजाराम बंधारा आज दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. तर, पंचगंगा नदीवरील इचलकरंजी आणि रुई हे बंधारेही पाण्याखाली आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने मॉन्सूनला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. शेजारीच असणाऱ्या रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्येही लवकरच पूर्ण क्षमतेने पावसाला सुरु होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मॉन्सूनपूरक वातावरण तयार झाले आहे. जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील इचलकरंजी आणि रुई हे दोन बंधारे पाण्याखाली आहेत. कोयना धरणातून सध्या 2111 क्‍यूसेक पाण्याचा विर्सग सुरु आहे. आज दिवसभर गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरु आहे. आणखी दोन ते तीन दिवसात जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासा गगनबावडा तालुक्‍यात 86 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पावसाने उघडी दिलेल्या मुदती भात, भुईमूग भांगलणी आणि कोळपणीला गती आली आहे. जिल्ह्यातील सर्वच शिवार शेतकऱ्यांनी गजबजुन गेली आहे. दरम्यान, कोळपणीनंतर होणाऱ्या पावसाचा पिकांसाठी निश्‍चितपणे फायदा होणार आहे.

24 तासातील पावसाची नोंद :

  • तालुका           पाऊस (मिली मीटरमध्ये)
  • हातकणंगेल          1.38
  • शिरोळ                निरंक
  • पन्हाळा               17
  • शाहूवाडी             25.17
  • राधानगरी            22
  • गगनबावडा         86
  • करवीर               6.27
  • कागल                15
  • गडहिंग्लज        12.14
  • आजरा             41.75

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com