चंदगड तालुक्‍यातील 'ती' व्यक्ती कोरोना निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

चंदगड तालुक्‍यातील 'ती' व्यक्ती दुबईवरुन आली होती. त्यात त्याला खोकला लागला. त्यामुळे कोरोनाच्या संशयावरून येथील उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण केंद्रात दाखल केले होते. मात्र, 'तो' निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील प्रयोगशाळेतून तसा अहवाल प्राप्त झाला आहे.

गडहिंग्लज : चंदगड तालुक्‍यातील 'ती' व्यक्ती दुबईवरुन आली होती. त्यात त्याला खोकला लागला. त्यामुळे कोरोनाच्या संशयावरून येथील उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण केंद्रात दाखल केले होते. मात्र, 'तो' निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील प्रयोगशाळेतून तसा अहवाल प्राप्त झाला आहे. 

सदरची व्यक्ती चंदगड तालुक्‍यातील एका गावची. दुबईवरुन नुकतेच गावाकडे आगमण झाले होते. त्यात त्याला खोकला लागला. त्यामुळे आजूबाजूला चर्चा सुरू झाली. खबरदारी म्हणून शनिवारी (ता.21) सायंकाळी साडेचारला येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर विलगीकरण केंद्रात दाखल केले. मात्र, कोरोनाचा रुग्णच दाखल केल्याची जनतेत अफवा पसरली होती. कोरोनाच्या धास्तीने एकमेकांना विचारून खात्री करुन घेतली जात होती.

उपजिल्हा रुग्णालयातून संबंधित व्यक्तीच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पुण्यातील प्रयोगशाळेत त्याची तपासणी झाली. रविवारी (ता.22) सायंकाळी त्याबाबतचा अहवाल अहवाल उपजिल्हा रुग्णालयाला मिळाला. सदरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सदरच्या रुग्णाला घरी पाठविण्यात आले आहे. मात्र, त्याला होम कॉरंटाईन करण्यात आल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In The Chandaga's Person's Corona Report Negative Kolhapur Marathi News