चंदगडला गोवा बनावटीची पाच लाखाची दारू पकडली

Chandgad Seized Five Lakh Liquor Kolhapur Marathi News
Chandgad Seized Five Lakh Liquor Kolhapur Marathi News

चंदगड : वाघोत्रे (ता. चंदगड) नजीक कणवी मंदिराजवळ येथील पोलीसांनी सापळा रचून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या टेंपोतून 5 लाख 36 हजार सोळा रुपयांची दारू पकडले. या प्रकरणी धोंडू सापसेट पास्ते (वय 38, रा. सासोली, ता. दोडामार्ग) व अभिषेक प्रमोद ठोंबरे ( 20, रा. कळणे, ता. दोडामार्ग) यांना अटक केली.

तुडीये (ता. चंदगड) येथील उमेश गोविंद आवडण यांच्यासाठी हे मद्य घेऊन जात असल्याचे संशयीत आरोपींनी सांगितल्याने आवडण याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, उप निरीक्षक दिलीप पवार यांनी याबाबत अमोल देवकुळे, दिगंबर गुरव, होमगार्ड संभाजी फाटक, सुरज नाईक यांना कारवाईचा आदेश दिला. त्यानुसार आज सायंकाळी सहाच्या सुमारास कणवी मंदिरानजीक सापळा रचण्यात आला. त्याचवेळी छोटा हत्ती गाडी वेगाने येत असलेली दिसली.

पोलीसांना पाहून ते बावचळले. गाडी थांबवून पोलीसांनी चौकशी केली. गाडीची झडती घेतली असता गोल्डन आईस व्हिस्कीचे 16 बॉक्‍स सापडले. एका बॉक्‍समध्ये 48 बाटल्या असून प्रत्येकी 112 रुपये किंमत आहे. त्यानुसार 5 लाख 36 हजार सोळा रुपयांची दारु जप्त करण्यात आली. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com