वादळासह कोसळणाऱ्या पावसाशी दोन हात करत सुरळीत केला चंदगडच्या "या' उपकेंद्राचा वीजपुरवठा

Chandgad's Power Supply Was Restored Kolhapur Marathi News
Chandgad's Power Supply Was Restored Kolhapur Marathi News

चंदगड : कानूर (ता. चंदगड) परिसरात वादळाने विजेचे खांब उन्मळून पडलेले. अनेक ठिकाणी झाडे तारांवर पडल्यामुळे तारा तुटलेल्या. प्रचंड कोसळणारा पाऊस आणि वेगवान वारा कामात व्यत्यय आणणारा; परंतु त्याहीपेक्षा नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस मनाला बोचणी देणारा. अत्यंत संयमाने परंतु गतिशीलपणे काम करीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत प्रवाह सुरळीत केला. 

चंदगड तालुक्‍याचा पश्‍चिम भाग दुर्गम, डोंगराळ आहे. वादळी पावसात झाडे तारांवर पडून तारा तुटतात. विजेचे खांबही कोलमडतात. या स्थितीत डोंगरदरीतून वीज वाहिनीच्या खालून पेट्रोलिंग करीत फॉल्ट शोधावा लागतो. 4 तारखेला कानूर उपक्रेंद्राला हलकर्णी उपकेंद्रातून येणारा 33 केव्ही पुरवठा बंद झाला. त्यामुळे या केंद्रावरील सर्व गावांतील वीज खंडित झाली. 12 किलोमीटरची ही वाहिनी भात व उसाच्या शेतातून जाते. कर्मचाऱ्यांनी प्रत्येक पोल आणि इन्सुलेटर तपासले.

एका ठिकाणी वीज वाहिनी खांबावरून खाली पडली होती. ती दुरुस्त करून 6 तारखेला रात्री पुरवठा सुरू झाला. कानूर उपकेंद्र सुरू झाले; परंतु 11 केव्ही कुरणी वाहिनीचा पुरवठा बंदच होता. पुन्हा शोध सुरू झाला. दोन ठिकाणी इन्सुलेटर फुटले होते, तर पुंद्रा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पोल कोसळला होता. त्याच्या तारा घटप्रभेच्या पुरात पडल्या होत्या. कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्या बाहेर काढल्या.

पोल उभा करून जोडणी केली आणि 7 तारखेला सायंकाळी सात वाजता या विभागाचा पुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. उपकार्यकारी अभियंता विशाल लोधी, शाखा अभियंता रवींद्र रेडेकर, जनमित्र नामदेव घोडे, विलास मूर्ती, बाळू खराडे, योगेश गावडे, भेरट तेजम, तुकाराम इंगळे यांनी यासाठी परिश्रम घेतले. 

कर्मचाऱ्यांचा अभिमान
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत कामाचे कौशल्य दाखवून दिले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यावर नागरिकांना त्रास होतो. त्यांच्याकडून तक्रारी येतात; परंतु त्या स्थितीत संयमाने झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे. 
- संजय पोवार, कार्यकारी अभियंता, गडहिंग्लज. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com