'त्यामुळे मुख्यमंत्र्यांची देवावर श्रद्धा कमी'

सकाळ वृत्तसेवा | Sunday, 30 August 2020

परंतु देवाला न मानणाऱ्या भुतांसोबत उद्धव सरकारमध्ये बसले असल्याने त्यांची देवावरील श्रद्धा कमी झाली आहे

मिरज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांची देवावर श्रद्धा होती; परंतु देवाला न मानणाऱ्या भुतांसोबत उद्धव सरकारमध्ये बसले असल्याने त्यांची देवावरील श्रद्धा कमी झाली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केली. राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करावीत, यासाठी राज्यव्यापी आंदोलनात पाटील येथून सहभागी झाले होते.

हेही वाचा - तरुणाईच्या निर्धाराने उभारले पाच दिवसांत कोविड सेंटर...

आंदोलनानंतर ते पत्रकारांना म्हणाले, त्यांची नसली तरी आमची देवावर श्रद्धा आहे. भारत हा जगामध्ये सर्वाधिक कमी मनोरुग्ण असलेला एकमेव देश आहे. परमेश्‍वरावरची श्रद्धा हे त्याचे एकमेव कारण आहे. त्यामुळे सर्व अटी आणि नियम मान्य करून सामान्य नागरिक देवाच्या दर्शनासाठी आतुर झाला आहे. केंद्र सरकारने सर्व देवस्थाने उघडण्याबाबत सूचना देऊनही राज्य सरकार कोरोनाची भीती घालून देवस्थाने उघडण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 

 

नगरपरिषद इमारत हलविण्यास चार माजी सरपंचासह विविध राजकीय पक्षांचा विरोध 

या निर्णयाला प्रथम शिवसेनेसह शहरातील चार माजी सरपंच व विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला आहे .कारण याच परिसरात तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन, पंचायत समिती ,तलाठी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम , भुमि अभिलेख, संजय गांधी निराधार योजना , आदीसह अन्य महत्वाची कार्यालये व बॅका याच परिसरात आहेत. त्यामुळे नागरिकांना सर्वच दृष्टीने सध्या आहे त्याच ठिकाणी नगर परिषद राहणे सोईचे ठरणार आहे . नियोजीत नगरपरिषदेची प्रशासकीय इमारत शहराच्या एका टोकाला होण्याऐवजी मध्यवर्ती ठिकाणीच होणे अत्यंत आवश्‍यक आहे. असा निर्णय घेऊन वेगवेगळ्या मार्गाने या साठी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरले .