पॉलिटेक्‍निक प्रवेश प्रक्रियेत बदल...यंदा प्रवेशाच्या होणार दोनच फेऱ्या

Changes In Polytechnic Admission Process Kolhapur Marathi News
Changes In Polytechnic Admission Process Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : आभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्‍निक) प्रथम वर्ष प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने नियमावली जाहीर केली आहे. यंदा प्रवेशाच्या दोनच फेऱ्या होणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत एक फेरी कमी केली आहे. परिणामी, अभ्यासक्रम आणि तंत्रनिकेतन निवडताना विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. राज्यात 378 संस्थात 1 लाख 8 हजार 41 प्रवेश क्षमता आहे. 

दहावीनंतर नोकरीचा उत्तम मार्ग म्हणून पॉलिटेक्‍निकला प्रवेश घेणाऱ्याची संख्या आधिक आहे. पॉलिटेक्‍निकनंतर प्रवेशपुर्व सामाईक परिक्षेशिवाय (सीईटी) आभियांत्रिकी पदवीच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळत असल्यानेही याकडे वळणाऱ्याची संख्या जास्त आहे. काल (ता.29) दहावीचा ऑनलाईन निकाल लागल्याने सर्वानाच पॉलिटेक्‍निक प्रवेशप्रकियेचे वेध लागले आहेत. दरवर्षी दहावीचा निकाल लागण्या अगोदरच ही प्रकिया सुरू होत होती.

यंदा कोरोनामुळे सर्व शैक्षणिक वेळापत्रकच कोलमडून गेले आहे. त्याचा परिणाम प्रवेशप्रक्रियेवर देखील झाला आहे. दरवर्षी केंद्रीय पध्दतीने ही प्रवेशप्रक्रिया राबवली जाते. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करून मुळ कागदपत्रांची छाननी करून घ्यावी लागते. केंद्रीय पध्दतीने तीन फेऱ्या, तर रिक्त जागांसाठी संस्थास्तरावर शेवटची फेरी होत होती. यंदा दोन फेऱ्या होणार असल्याचे प्रवेशप्रक्रिया नियमावलीत स्पष्ट केले आहे. त्यामुळे विविध अभ्यासक्रम व संस्था निवडताना आधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

फेऱ्या कमी असल्याने पसंतीक्रम देताना विद्यार्थ्यांसह पालकांचीही कसोटी आहे. पोस्ट एसएससी पदविका अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता वाढविली आहे. यावर्षीपासून दहावी उर्त्तीण अशी करण्यात आली आहे. यापुर्वी आठवी, नववी, दहावीचे विद्यार्थ्यी यासाठी अर्ज करू शकत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच पॉलिटेक्‍निकमध्ये अर्ज भरण्यासाठी सुविधा केंद्र असते. या आठवड्यात प्रवेशप्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाच्या dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे.

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com