अजबच : एकाच जमिनीचे दोन व्यवहार...

Cheating In Land Sale Case Kolhapur Marathi News
Cheating In Land Sale Case Kolhapur Marathi News

बालिंगा (कोल्हापूर) : शहराशेजारी असणाऱ्या बालिंगा, पाडळी खुर्द, फुलेवाडी रिंगरोड, शिंगणापूर (ता. करवीर) परिसरातील प्लॉट, शेत जमीन खरेदी करण्यासाठी दररोज व्यवहार होत आहे. मात्र, एकच शेत जमीन किंवा प्लॉट दोघांना विक्री करून ग्राहकांची फसवणूक करणारे काही प्लॉटधारक सक्रीय झाले आहे. पूर्वी विक्री केलेली जमीन आणि प्लॉट पहिल्या व्यक्तिच्या नावे करून न देता त्याचा सातबाराचा उपयोग करून दुसऱ्याला विक्री करणाऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी व्यवहार करताना सावधान राहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. 
शहरापासून जवळच असणाऱ्या बालिंगा, पाडळी खुर्द, फुलेवाडी रिंगरोड, शिंगणापूर परिसरातील जमिन व प्लॉटला मागणी वाढत आहे. दरम्यान, या परिसरातील जमीन यापूर्वी विक्री करून खरेदी दाराकडून पैसे घेणाऱ्या प्लॉटधारक किंवा जमिन मालकांकडून पूर्वीच्या खरेदीदाराची फसवणूक करून एकच जमिन दुसऱ्याला विक्री करण्याचा घाट घातला जात आहे. 

 खोटे करारपत्र 
आमुक एक जमीन दाखवायची त्याच्याकडून जमीनीची पूर्ण किंवा निम्मी रक्कम घ्यायची. जमिन किंवा प्लॉट विक्री करताना अगदी विश्‍वासाने विक्री करायची. खरेदीदाराकडून त्या जमिनीची व प्लॉटची रक्कम घेतल्याचे संचकार पत्र किंवा करारपत्र करून दिले जाते. मात्र, ऐनवेळेला हीच जमीन दुसऱ्याला विक्री करून लोकांची लुबाडणूक करण्याचा डाव काही प्लॉट आणि जमिनधारक करत आहेत. याला, शहरातील नेहमीच वादात असणाऱ्या काही व्यक्तीही साथ देत असल्याचे चित्र आहे. 

  काही उपयोग नाही पै-पै जमा करून 
दरम्यान, ज्या-ज्या लोकांची फसवणूक झाली, असे लोक एकच जमिन दोन वेळा विक्री करणाऱ्यांवर आणि जमिन घेणाऱ्यांवरही फौजदारी दाखल करण्याच्या तयारी आहेत. काबाडकष्ट करून जमीन किंवा प्लॉट घेणाऱ्यांची फसवणूक होत आहे. यावर अशा तक्रारी महसूल आणि पोलीस ठाण्यात येत आहे. पै-पै जमा करून स्थावर खरेदी केलेली असताना त्यांची प्लॉट किंवा जमीनधारकांकडून फसवणूक होत आहे. त्यामुळे जमीन घेणाऱ्यांनीही सावधगिरी पाळावी लागणार आहे.


पैसे देवूनही झाली फसवणूक
आम्ही पंधरा वर्षापूर्वी एक शेत जमीन घेतली होती. त्याचे सर्व पैसे देवून संचकार पत्रही केले होते. मात्र, खरेदी पत्र करून देताना जमीन विक्री करणाऱ्याने खरेदी करून दिली नाही. पंधरा वर्षापेक्षा जास्त वर्ष या शेताच कब्जा आमच्याकडेच होता. त्यामुळे तहसिलदारांनी स्वत: पाहणी करून या शेतावर पीकपाहणीसाठी आमची नावे लावली होती. तरीही, आमची फसवणूक झाली. 
सतीश शि. पाटील, पाडळी खुर्द, ता. करवीर 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com