इचलकरंजीत एसटीपी प्रकल्पात क्लोरिनचा तुटवडा

 Chlorine shortage in Ichalkaranji STP project
Chlorine shortage in Ichalkaranji STP project

इचलकरंजी  ः मैलायुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पावर चार-पाच महिने क्‍लोरीन साठा नसल्याची धक्कादायक माहिती आज पुढे आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकांने केलेल्या पाहणीवेळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पथकांने पंचनामा केला आहे. 
पर्यावरण समितीचे सदस्य संतोष हत्तीकर यांनी एसटीपी प्रकल्पातून प्रक्रिया न करताना सांडपाणी थेट काळ्या ओढ्याद्वारे पंचगंगा नदीपात्रात सोडण्यात येत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी नीलेश मरभळ यांच्या पथकांने आज टाकवडे वेस येथील एसटीपी प्रकल्पाचे उपसा केंद्र (ंसंपवेल) आणि सांगली रोडवरील प्रकल्पाची पाहणी केली.

पाहणीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. टाकवडे वेस येथील उपसा केंद्रामध्ये प्लास्टिक, प्लास्टिकच्या बाटल्या व अन्य वस्तू मोठ्या प्रमाणात तरंगत होत्या. सांगली रोडवरील आसरानगर कचरा डेपोजवळील प्रकल्पाच्या पाहणीत चार-पाच महिने क्‍लोरीन साठा आलाच नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून पाहणीवेळी मिळाली. सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी महत्त्वाचा घटक असलेला क्‍लोरीन साठा नसल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले. इचलकंरजी इचलकरजी इचलकरंजी 

कचरा डेपोला आग 
दरम्यान, कचरा डेपोवर लागलेल्या आगीची पाहणी केली. मात्र आग कशामुळे लागली याबाबत कर्मचाऱ्यांनी उलट-सुलट उत्तर दिले. आगीबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना पालिकेला यावेळी पथकांकडून दिल्या.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com