कोथंबिरीच्या पेंडीला 50 रुपये भाव

Cilantro Costs Rs 50 Kolhapur Marathi News
Cilantro Costs Rs 50 Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : मागणीपेक्षा आवक कमी असल्याने कोथंबिरीच्या पेंडीला आज 50 रुपये भाव मिळाला. भाजी मंडईत पालेभाज्यांची आवक कमीच आहे. फळ बाजारात अननसाची आवक सुरू झाली आहे. कांदा, लसूण यांचे दर उतरले असून गवारचे भाव तेजीत आहेत. हिरवी मिरची आणि कोबीची आवक अधिक आहे. 

वाढत्या उन्हाळ्यामुळे भाजी मंडईत पालेभाज्या आणि कोथंबिरीची आवक घटली आहे. मागणी मात्र कायम असल्याने दर कडाडले आहेत. कोथंबिरीच्या 100 पेंड्यांना आज तीन हजार रुपये असा दर मिळाला. किरकोळ बाजारात 50 रुपये पेंडी अशी विक्री सुरू होती. लाल भाजी 20 ते 30 रुपये पेंडी असा दर होता. तुलनेत हिरवी मिरची आणि कोबीची आवक अधिक आहे. ढबू, वांगी, भेंडी, दोडका यांची आवक स्थिर आहे. दहा किलोचे दर असे; ढबू, भेंडी आणि दोडका 300, टोमॅटो, वांगी 200, गवार 500, फ्लावर 200 रुपये डझन. 

कांदा आणि लसणाचे भाव आवक वाढल्याने कमी झाले आहेत. कांदा 600 ते 1200 रुपये क्विंटल आहे. किरकोळ बाजारात 10 ते 16 रुपये या दराने विक्री सुरु आहे. बटाट्याच्या दरात क्विंटलमागे 200 रुपयांनी वाढ झाली आहे. 2200 ते 2500 रुपये क्विंटल असा दर आहे. किरकोळ बाजारात 30 रुपये दराने विक्री सुरू आहे. लसूण 4000 ते 6500 असा क्विंटलचा दर असून 50 ते 100 रुपये असा किलोचा किरकोळ बाजारात दर आहे. 

अननसाची आवक 
फळ बाजारात अननसाची आवक सुरू झाली आहे. आकारानुसार तीस ते पन्नास रुपये दर असल्याचे फळ विक्रेते अमर रणदिवे यांनी सांगितले. आंब्यांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. आवक अधिक असल्याने दर कमी झाले आहेत. 200 ते 300 रुपये डझन असा दर आहे. 

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com