esakal | वीज ग्राहकांची कोंडी ; साडे तीन हजाराहून अधिक जोडण्या प्रलंबीत

बोलून बातमी शोधा

claims of supply of 4 thousand meters electricity marathi news}


 घरगुती, कृषीपंपाचा पेच  4 हजार मीटरचा पुरवठ्याचा दावा 

वीज ग्राहकांची कोंडी ; साडे तीन हजाराहून अधिक जोडण्या प्रलंबीत
sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर :  शेतीपंपाची वीज जोडण्या तातडीने देण्याची अंमलबजवणी सुरू झाली मात्र वीज मीटर महावितरणकडे शिल्लक नसल्याने वीज ग्राहकांची कोंडी झाली आहे. अशात घरगुती वीज ग्राहकांनाही हाच अनुभव येत आहे. जिल्हाभरात जवळपास साडे तीन हजाराहून अधिक जोडण्या प्रलंबीत आहेत. यातील बहुतांशीना वीज मीटरचा तुटवडाच कारणीभूत आहे. परिणामी उन्हात शेतीपिके वाळत आहेत. तर घरगुती वीज ग्राहकांना उकाड्याने हैराण होण्याची वेळ आली आहे. 

एखाद्या ग्राहकाने चिवटपणे पाठपुरावा केला तर महावितरणचे काही कर्मचारी खासगीतून वीज मीटर घेण्याचा सल्ला देतात तर काही अभियंते खासगीतील मीटर अचूक असेल याची शाश्‍वती नसल्याने महावितरणचेच मीटर घ्या, असेही सांगतात तर खासगी बाजारातील मीटर इलेक्‍ट्रॉनिक्‍स मीटर दिड हजार ते 4 हजार रूपये किंमतीत वेगवेगळ्या क्षमतेनुसार मिळते ते महावितरणकडून तपासून घ्यावे लागते, परिणामी ग्राहकाला वेळ, श्रम, मनस्ताप वाट्याला येत आहेत. 

टोकाचा पाठपुरावा करणाऱ्या ग्राहकांना थेट वीज जोडणी (मीटर न जोडता) देऊ पण त्यासाठी बील सरासरीने घेतली जाईल, असा पर्यायही सुचविला जातो. असे घडल्यास वीज वापर कमी झाला आणि बिले जास्त आली तर ग्राहकांचे नुकसान, वीज वापर जास्त झाला बिल कमी आले तर महावितरणचे नुकसान होण्याचा संभव अधिक आहे. 

"" महावितरणकडे अर्जकरून पैसे भरून कृषीपंपासाठी वीज जोडणीची प्रतिक्षेतील शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याची तयारी महावितरण देत आहे, मात्र प्रत्यक्ष अशा वीज जोडणीसाठी वीज मीटर शिल्लक नसल्याचे महावितरणच्या कार्यालयातून सांगण्यात येते. त्यामुळे वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. मंत्री महोदय कृषी वीज जोडण्याची घोषणा करतात तेव्हा मीटरचा तुटवडा अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितला नव्हता का असा प्रश्‍न आहे. त्यामुळे वीज जोडण्या मीटर तातडीने मिळावे यासाठी इरिगेशन फेडरेशन पाठपुरावा करीत आहे.'' 
इरिगेशन फेडरेशन विक्रांत पाटील 

मीटर न देणाऱ्यावर कारवाई : सुधाकर निर्मळे 
महावितरणचे मुख्य अभियंता सुधाकर निर्मळे म्हणाले, ""1 एप्रील 2018 पूर्वीच्या प्रलंबीत वीज जोडण्या सद्या देत आहोत. यात वीज खांबापासून तीस मीटरच्या आत व जिथे रोहीत्र आहे, अशा जोडण्या प्राधान्याने देत आहोत. या कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी सद्या वीज मीटरची गरज नाही. मीटर उपलब्ध झाल्यानंतर दिली जातील तर सिंगल फेज घरगुती, वाणिज्य वीज ग्राहकांसाठी परिमंडलात जवळपास 7 हजार वीज जोडण्या देणे प्रलंबीत आहेत. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याला अडीच हजार तर सांगली जिल्ह्याला दिड हजार वीज मीटर नुकतीच पाठवलेली आहेत. ही वीज मीटर येणाऱ्या आठवड्याभरात देणे सुरू होईल. तरीही आणखी काही वीज मीटर मागवलेली आहेत. त्यामुळे कोणी वीज ग्राहकांना वीज मीटर उपलब्धकरून देत नसतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.''  


संपादन- अर्चना बनगे