स्वॅब तात्काळ निकालात काढा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

स्वॅब तात्काळ निकालात काढा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर  : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रयोगशाळेकडे आणि डॉ. डी. वाय.पाटील रूग्णालयाकडे प्रलंबित असणारे कोरोना तपासणी अहवाल उद्यापर्यंत पूर्ण करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या. 
कोरोना प्रतिबंध उपाययोजना व अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रलंबित स्वॅब तपासणी अहवाल, जिल्ह्यातील कोव्हिड काळजी केंद्रांमधील सुविधा, आयुष सर्व्हे, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांना पुरविण्यात येणारी सुविधा, संस्थात्मक अलगीकरणमधील सुविधा, विविध उपकरणांचा होणारा पुरवठा, मनुष्यबळ या सर्वांचा यात समावेश होत आहे. 
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, " क्षेत्रीय स्तरांवर आज 5 वाजेपर्यंत स्वॅब नमुने तात्काळ प्रयोगशाळेकडे पाठवावेत. त्याचबरोबर नाकारण्यात आलेल्या नमुन्यासाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करून समन्वय आणि नियंत्रण करावे. कोव्हिड काळजी केंद्र, कोव्हिड आरोग्य केंद्रामध्ये सुविधा पूर्ण करण्याबाबत पाठपुरावा करावा. संस्थात्मक अलगीकरण केंद्र, सी. सी. सी. याठिकाणी फवारणी यंत्राचा पुरवठा करावा, प्रत्येक तालुकानिहाय आशा सेविकांची गट निवडून त्यांच्यामार्फत सर्व्हेक्षण सुरू करावे. तपासणी नाक्‍यांवर, अलगीकरण केंद्र, रूग्णालयात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांना सर्व सुविधा आणि अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक औषधांचे वाटप करा, असेही त्यांनी सांगितले. 
या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गंलाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे आदी उपस्थित होते.

डॉक्‍टर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची विश्रामगृहात सोय 
जिल्ह्यातील सी. सी. सी., सी.पी.आर, प्रयोगशाळा याठिकाणी सेवा देणारे डॉक्‍टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृहात निवासाची तसेच जेवणाची सोय करण्यात येईल. त्याबाबत संबंधितांनी जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच सी.पी.आर.चे वैद्यकीय अधीक्षक यांना कळवावे, असेही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com