गडहिंग्लजमध्ये थंडी; तापमान 14 अंशापर्यंत घसरले

Cold In Gadhinglaj; The Temperature Dropped To 14 Degrees Kolhapur Marathi News
Cold In Gadhinglaj; The Temperature Dropped To 14 Degrees Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : या आठवड्यात गडहिंग्लज शहर आणि तालुक्‍यात थंडीने कहर केला आहे. हुडहुडी भरणाऱ्या थंडीने नागरिक गारठून गेले आहेत. त्यामुळे शेकोट्या पेटू लागल्या असून आज सकाळी सात वाजता येथील संशोधन केंद्रात मोजलेले तापमान 16 अंश सेल्सियस होते. गेल्या तीन दिवसापासून हे तापमान सरासरी 14 ते 16 अंश सेल्सियसपर्यंत आहे. 

विशेषत: नोव्हेंबरपासून थंडीचे आगमन होते; परंतु यावर्षी ही थंडी डिसेंबरमध्ये जाणवू लागली आहे. आज सकाळी सात वाजता मिरची संशोधन केंद्रातील तापमापकावर 16 अंश सेल्सियस किमान तापमान नोंदले गेले. हेच तापमान सातपूर्वी पहाटेच्या सुमारास 13 ते 15 अंश सेल्सियसपर्यंत असते. गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानाची हीच सरासरी आहे. त्यामुळे थंडीने माणसे कुडकुडत आहेत. 

अचानक वाढलेल्या थंडीमुळे शेकोट्या पेटू लागल्या आहेत. स्वेटर, कानटोपी व तोंडाला रूमाल बांधून लोक बाहेर पडत आहेत. विशेषत: पहाटे वॉकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांत वाढत्या थंडीमुळे घट झाल्याचे चित्र आहे. ऊस तोड हंगाम सुरू असल्याने थंडीतच मजूर शेतवडीत पाहायला मिळत आहेत. त्यावेळी ते शेतातच शेकोटी पेटवून ऊस तोडत असल्याचे चित्र आहे.

सध्या पाण्याचा उपसा करून शेतीला पाणी देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेही थंडीत भर पडत आहे. थंड वारे वाहत आहेत. यातून सर्दी, घसा खवखवणे, खोकल्याची लक्षणेही दिसत आहेत. या लक्षणांवर लागलीच उपचार करून घेण्याची गरज आहे. थंडीपासून बचावासाठी आवश्‍यक गरम कपड्यांची खरेदीही वाढली आहे. 

थंडीत घ्यावयाची काळजी 
- विशेषत: मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, दमा रुग्णांनी अधिक खबरदारी घ्यावी. 
- या लक्षणाच्या रुग्णांनी पहाटे लवकर बाहेर पडू नये. 
- थंडीच्या कालावधीत आहारात नेहमीपेक्षा काहीसे अधिक तेल असावे. 
- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्दी, खोकल्याची लक्षणे असणाऱ्यांनी तत्काळ उपचार घ्यावेत. 

रुग्णांनी खबरदारी घ्यावी
अचानक थंडी वाढल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. विशेषत: विविध आजाराच्या रुग्णांनी खबरदारी घ्यावी. अजून कोरोना संसर्गाची भीती आहे. तोंडाला मास्क असल्याशिवाय बाहेर पडू नये. थंडीमुळे इन्फेक्‍शन, ऍलर्जीचे प्रमाण वाढते. त्यामुळे रुग्णांनी उपचारासह औषधे घेण्यात टाळाटाळ करू नये. 
- डॉ. चंद्रशेखर देसाई, एम.डी. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com