आँनलाइन द्वारे महिन्याभरात पूर्ण केला 25 टक्के अभ्यासक्रम

Completed 25 Percent Of The Syllabus In A Month Through Online Kolhapur Marathi News
Completed 25 Percent Of The Syllabus In A Month Through Online Kolhapur Marathi News

चंदगड : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांचे दरवाजे अद्याप उघडलेले नसले तरी शैक्षणिक वर्ष मात्र सुरू झाले आहे. वर्गात प्रत्यक्ष अध्यापनाला कधी सुरवात होईल, याचा अंदाज नसल्याने सर्वच शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांनी ऑनलाईनचा पर्याय अमलात आणला आहे. व्हॉट्‌स ऍपच्या माध्यमातून प्रत्येक वर्गाचे ग्रुप तयार करून विषय शिक्षक आपापल्या विषयाचे व्हिडिओ, ऑडिओ पाठवत आहेत. विद्यार्थी त्याचा किती वापर करतात हे समजत नसले तरी केवळ एका महिन्यात 25 टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचे एका शिक्षकाने सांगितले. 

शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने वावर आणि जवळीकता पाहता कोरोनाचे समूळ उच्चाटन होईपर्यंत प्रत्यक्ष वर्ग भरवता येणार नसल्याचे सांगितले जाते. ही वस्तुस्थिती जाणून शाळा, महाविद्यालयांनी अभ्यासक्रमाला सुरवात केली आहे. प्रत्येक वर्गनिहाय विद्यार्थ्यांचे व्हॉट्‌स ऍप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्यावर प्रत्येक विषय शिक्षक आपला अभ्यासक्रमाचा भाग दररोज अपलोड करतात. विद्यार्थ्यांना शंका असेल तर ते थेट मोबाईलवरून किंवा व्हॉट्‌स ऍपवरून विचारणा करतात. त्यानंतर शंका निरसन केले जाते.

प्रत्येक वर्गावर जाऊन शिकवण्यासाठी लागणारा वेळ विचारात घेता व्हॉट्‌स ऍपवरील हा उपक्रम शिक्षकांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे दररोज अभ्यासक्रमाचा पुढचा भाग शिकवणे शक्‍य झाले आहे. एक महिन्यात 25 टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचे शिक्षकाने सांगितले. ही जमेची बाजू असली तरी वर्गातील सर्वच विद्यार्थी ग्रुपवर सामील करता आलेले नाहीत.

काही विद्यार्थ्यांकडे ऍण्ड्रॉईड मोबाईल नाही. काहींच्या गावात मोबाईल नेटवर्कच नाही. काही गावांत इंटरनेट सुविधा सुस्पष्ट नाही. शिवाय किती विद्यार्थ्यांनी पाठवलेली अभ्यासक्रमाची पोस्ट बघितली हे समजत नाही. 
जसे शाळा, महाविद्यालयानुसार व्हॉट्‌स ऍप ग्रुप तयार झाले आहेत, तसेच जिल्हा स्तरावर विषय शिक्षकांचे ग्रुप तयार झाले आहेत.

ते आपापला व्हिडिओ किंवा ऑडिओ या ग्रुपवर पोस्ट करतात. आपल्या अध्यापनाचे सार्वत्रिकरण होणार याची कल्पना असल्यामुळे उत्कृष्ट आणि दर्जेदार अध्यापन करण्याकडे प्रत्येकाचा कल आहे. यातून काही शिक्षकांना जिल्हा स्तरावर मान्यता मिळत आहे. मात्र, विविध कारणांनी वंचित विद्यार्थ्यांचे काय करायचे, हा खरा प्रश्‍न आहे. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला त्याच्या भाषेत शिकवणे गरजेचे आहे. ते ऑनलाईनद्वारे होत नाही. दुसरीकडे एका कुटुंबात दोन, तीन विद्यार्थी असतील, तर तेवढे मोबाईल देणे पालकांना परवडणार आहे का, याचाही विचार करायला हवा. दुर्गम भागात रेंज नसेल तर त्या विद्यार्थ्याने काय करायचे, हा प्रश्‍नही अनुत्तरित राहतो. 
- एक पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com