नृसिंहवाडीत मिठाईपेठ 70 दिवसांनी सुरू 

The Confectionery Market In Narsinhwadi Starts After 70 Days Kolhapur Marathi News
The Confectionery Market In Narsinhwadi Starts After 70 Days Kolhapur Marathi News

नृसिंहवाडी : येथील मेवामिठाई व हॉटेल्स दुकाने, अशी सुमारे 130 मिठाई पेठेतील दुकाने तब्बल 70 दिवसांच्या लॉकडाउननंतर आज गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर उघडली गेली. गतवर्षीच्या महापुराच्या संकटानंतर कोरोनामुळे मेवामिठाई दुकानदार, हॉटेल्स व इतर दुकानांच्या भाविकांनी पाठ फिरवल्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. 

जिल्हाधिकारी दौलत देसाई व तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी दिलेल्या आदेशानुसार ही दुकाने सामाजिक अंतर, सॅनिटायझर, मास्क यांचा वापर करून मिठाई व इतर वस्तूंची देवघेव करण्याच्या स्वरूपातील शासन निर्देशित अटींना गृहीत धरून सुरू झाली. अनेक व्यापाऱ्यांनी दुकानाची स्वच्छता करून परिसर स्वच्छ केला. पाण्याने दुकाने धुऊन घेतली. मिठाई वगळता इतर आवश्‍यक बाबींची स्वच्छता करून त्यांची मांडणी केली आहे. येथून पुढे भाविकांच्या संख्येवरूनच पेढे, बर्फी नव्याने बनवण्याच्या हालचाली गतिमान होतील. 

आज एकूणच व्यापाऱ्यांच्यामध्ये उत्साह पाहण्यास मिळाला. व्यापाऱ्यांच्या मदतीला त्यांच्या कुटुंबातील सर्वच घटक पुन्हा नव्या उमेदीने दुकान उभारण्यासाठी प्रयत्नशील झालेले पहावयास मिळाले. मात्र, दत्तमंदिर सुरू होत नाही तोपर्यंत भाविकांची संख्या वाढणार नाही, हे निश्‍चित. 

नियमांच्या माध्यमातून व्यापाराची लगबग
तब्बल सत्तर दिवसांनंतर गुरुवारी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर आजपासून नऊ ते पाच या वेळेत दुकाने सुरू राहतील. भाविकांसाठी प्रशासनाने घालून दिलेल्या सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर या नियमांच्या माध्यमातून मिठाई व्यापाराची लगबग सुरू राहील. व्यापाऱ्यांकडून कायद्याचे उल्लंघन होणार नाही. 
- अनंतराव धनवडे, अध्यक्ष व्यापारी असोसिएशन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com