conflicting crimes three injured incidents in the Gandhi Maidan area kolhapur
conflicting crimes three injured incidents in the Gandhi Maidan area kolhapur

बिर्याणीचे पैसे देण्यावरून हाणामारी: तिन जण जखमी

कोल्हापूर : बिर्याणीचे पैसे देणे-घेण्याच्या वादातून गांधी मैदानासमोर दोन गटात हाणमारी झाली. यात बीअरची बाटली व हत्याराचा वापर झाला. यात तिघे जण जखमी झाले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. 


पोलिसांनी दिलेली माहिती,

रोहित माने याने फिर्यादीत म्हटले आहे, मित्र अतुल खडके, सिद्धार्थ पाटील बिर्याणी आणण्यासाठी गांधी मैदानजवळ गेले होते. येथे बिर्याणीच्या पैशावरून त्याला संशयित बबलू चव्हाण, अभिषेक भोसले, ओंकार माळी यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे.

ओंकार माळी याने दिलेल्या फिर्यादीत संशयित अतुल खडके, रोहित माने व सिद्धार्थ पाटील यांनी एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून बिअरच्या बाटलीने मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com