ताराराणी महोत्सवाला ग्राहकांचा प्रतिसाद 

Consumers' response to the Tararani Festival
Consumers' response to the Tararani Festival

कोल्हापूर : सोलापुरी रोट... खर्डा भाकरी... मांसाहारी जेवणाची लज्जत चाखण्यासाठी स्टॉलवरील गर्दी आणि तांदूळ, हस्तकलेच्या, कलाकुसरीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी उडालेली झुंबड... हे चित्र होते, ताराराणी महोत्सवाचे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी (ता.23) ताराराणी महोत्सवाला ग्राहकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. 

या महोत्सवात पहिल्याच दिवशी तब्बल नऊ लाखांची उलाढाल झाली आहे. बचत गटांच्या उत्पादित वस्तू व खाद्यपदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यातर्फे आयोजित विभागीय पातळीवरील ताराराणी महोत्सव आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलच्या मैदानावर सुरू आहे. प्रदर्शनात एकूण 104 स्टॉल्स आहेत. विविध प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांनी आपल्या वस्तू प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवल्या आहेत.

प्रदर्शनामध्ये कोल्हापूरी साज, चप्पल, गूळ, काकवी, दागिने, कापडी पिशव्या, बेदाणे, हळद, कंदी पेढे, मातीची भांडी, घोंगडी, विविध प्रकारची लोणची, पापड, साताऱ्याची बिस्कीटे, पर्सेस, कपडे आदींचा समावेश आहे. चंदगड तालुक्‍यातील मोरया स्वयंसहाय्यता समूहाने मांडलेल्या गॅसवर चालणाऱ्या मातीच्या भांड्यांना विशेष पसंती मिळते आहे. सायंकाळी सादर झालेल्या "बहारो गीत बरसाओ' या बहारदार कार्यक्रमाने महोत्सवाची रंगत आणखी वाढली. हे प्रदर्शन बुधवार (ता. 26) पर्यंत खुले राहणार आहे. 

उद्योजकतेचे कौशल्य आले पुढे 
उत्पादनांच्या देवाणघेवाणी व्यतिरिक्त आपुलकीचा संवाद बचत गट व ग्राहकांतील नाते दृढ करत होता. त्यातून ग्रामीण उद्योजिकांचे कौशल्य सिद्ध होत होते. ओ दादा, शेतातील घनसाळ तांदुळ घ्या अशी साद बचत गटाच्या महिला घालत होत्या. तर कोणी ग्राहकाला कोल्हापुरी गुळाची चव दाखवत होते. तर कोणी नाविण्यपुर्ण पदार्थांची खासियत सांगण्यात व्यस्त होते. पदार्थांची विक्री झाल्यावर या महिलांच्या चेहऱ्यावर समाधान पसरत होते. 

तांबडा पांढरा, पुरणपोळीसह रवा वडा 
महोत्सवात जवळपास 40 खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. यामध्ये बचत गटांच्या महिलांनी विक्रीसाठी ठेवलेल्या मांसाहार व शाकाहारी पदार्थांना खवय्यांची पसंती मिळत आहे. कोल्हापुरी खासियत तांबडा - पांढरा रस्सा, पुरणपोळी, पिटल भाकरी, खर्डा भाकरी, रवा वडा, थालीपीठ, सोलकढी, पंजाबी लस्सींचा आस्वाद खवय्ये लुटत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com