कोरोनाचा पशुसंवर्धनालाही फटका

 कोरोनाचा पशुसंवर्धनालाही फटका

कोल्हापूर ः कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेले दोन महिने सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे पशुसंवर्धन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कामधेनू योजनेतील पशुचिकित्सा शिबिरे रद्द करावी लागली आहेत. परिणामी, काही जनावर मालक शासकीय पशुचिकित्सालयात येऊन स्वतःहून जनावरांची आरोग्य तपासणी व उपचार घेत आहेत; तर काहीजण जनावरांची तपासणी व उपचार टाळत असल्याने जनावरांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो, अशी संमिश्र स्थिती निर्माण झाली आहे. 
शासकीय पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्ह्यात कामधेनू योजनेंतर्गत गावोगावी शिबिरे घेण्यात येतात. त्या- त्या गावातील जनावरांची आरोग्य तपासणी या शिबिरात होते. एक दिवसात तीन गावांत हे शिबिर होते. या शिबिरात जनावरांना लस देणे, जंताचे औषध देणे, वंध्यत्व तपासणी करणे अशी कार्ये केली जातात. शिबिरात एकाच वेळी जास्त संख्येने जनावरे व त्यांच्यासोबत मालक येतात. त्यामुळे गर्दी होते. 
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशभर लॉकडाउन पुकारला आहे. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी जनावरांचे आरोग्य शिबिर घेणे टाळले जात आहे. तसेच, जनावरांची वाहतूक करणे शक्‍य झालेले नाही, तसेच शिबिरे घेणेही शक्‍य झालेले नाही. 

दक्षपशुपालकांचे तपासणीस प्राधान्य 
दक्षपशुपालक स्वतःहून शासकीय पशुचिकित्सालयात जनावरांना आणून तपासणी व उपचार करून घेतात. दिवसाला 40 ते 50 जनावरे तपासणीसाठी येत आहेत. काही जण गावात शिबिर होईल, तेव्हा पाहू म्हणत वेळ काढत आहेत. अशा जनावरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. जिल्हाभरात 100 वर पशुचिकित्सालये आहेत. येथे रोज 30 ते 40 जनावरांवर उपचार होतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com