दिलासादायक : ६७४ गावांतून कोरोना झाला हद्दपार

Corona deported from 674 villages
Corona deported from 674 villages

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आजघडीस नियंत्रणात आहे. जिल्ह्यात आता केवळ १०३७ कोरोनाचे रुग्ण असून त्यांच्यावर विविध आरोग्य संस्थांमध्ये उपचार सुरू आहेत. यातील ७७ रुग्ण सध्या गंभीर आहेत. १०२५ ग्रामपंचायतींपैकी ९५१ ग्रामपंचायती कोरोना बाधित होत्या; मात्र आता यातील ६७४ गावांतून कोरोना हद्दपार झाला आहे, तर केवळ १० गावांतच दोन अंकीने कोरोनाचे रुग्ण आहेत. एकूणच जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिलासादायक आहे. पुढील दोन महिने अशीच स्थिती राहण्यासाठी नागरिकांसह प्रशासनाला कंबर कसावी लागणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर ३.४ टक्‍के असून तो आजही धक्‍कादायक आहे.
  

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोनाने हाहाकार उडाला. दररोज तीन अंकी तर अधूनमधून चार अंकी संख्येत रुग्ण सापडले. यावर नियंत्रण आणताना जिल्हा प्रशासनाची यंत्रणाही कोलमडून गेली. या कालावधीत दर आठ दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत गेली, मात्र कोरोनाचा हा कहर महिनाभरापासून टप्प्याटप्प्याने कमी झाला आहे. आठ महिन्यांपासून ठप्प झालेले जनजीवन आता कुठे पूर्वपदावर येत आहे. कोविड सेंटर आता काही काळासाठी बंद करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा कहर झाला होता. जिल्ह्यातील ९४ टक्‍के गावे बाधित झाली होती;

मात्र ही गावे आता कोरोनामुक्‍त होऊ लागली आहेत. गावांसह शहरातही कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. लोकही चाचणी करून घेण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. भीती कमी झाल्यानेच चाचण्यांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे, मात्र पुढील दोन महिने महत्त्वाचे आहेत. कोरोनाची दुसरी लाट ठिकठिकाणी सुरू झाली आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट मोठी येण्याची शक्‍यता असल्याने सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.

कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्वेक्षण, चाचण्या, शोधमोहीम सुरू आहे. हीच परिस्थिती पुढील काही महिने राहणे आवश्‍यक आहे. दुसरी लाट यायची नसेल तर लोकांनी मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे व सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे.
 - डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

दृष्टिक्षेपात 
आतापर्यंत झालेल्या चाचण्या  - २ लाख १७ हजार ४०२
१० लाख लोकांमागे ५१ हजार २८५ चाचण्या
मागील ७ दिवसांतील चाचण्या ३७७
आयसीयू बेडची संख्या ४१९. यातील १७ टक्‍के बेड उपयोगात
१३८ व्हेंटिलेटरपैकी २७ टक्‍के व्हेंटिलेटर वापरात
दहा गावांतच १० पेक्षा अधिक रुग्ण
आजरा (१२), चंदगड (२०), करंजगाव (१०), कुंभोज (१३), हातकणंगले (११), उचगाव (१९),भुयेवाडी (१०), पन्हाळा (१३), सरुड(१३), शाहूवाडी (१२).
  एकूण रुग्ण संख्या ४७९६१
  बरे झालेले रुग्ण ४५२८७
  मृत्यू १६३७
  उपचार सुरू असलेले रुग्ण १०३७

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com