दुबईहून आलेल्या "त्या'  व्यक्तीस कोरोना नाही 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

आख्खं जग कोरोना विषाणूशी झुंजत आहे. चीन, इटली या देशांनी तर लॉकडाऊनच जाहीर केले आहे. त्यामुळे इतर देशांतही काळजी घेतली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात एक जण दुबईहून आला. त्याला सर्दी खोकला झाला होता. कोरोनाने धास्तावलेल्या ग्रामस्थांत चर्चाा सुरू झाली... मग त्याची तपासणी केली... आणि

गडहिंग्लज (कोल्हापूर)  : चंदगड तालुक्‍यातील "ती' व्यक्ती दुबईवरुन आली होती. त्यात त्याला खोकला लागला. त्यामुळे कोरोनाच्या संशयावरून येथील उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण केंद्रात दाखल केले होते. मात्र, "तो' निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील प्रयोगशाळेतून तसा अहवाल प्राप्त झाला आहे. 
ही व्यक्ती चंदगड तालुक्‍यातील एका गावची. दुबईवरुन नुकतेच गावाकडे आगमण झाले होते. त्यात त्याला खोकला लागला. त्यामुळे आजूबाजूला चर्चा सुरू झाली. खबरदारी म्हणून शनिवारी (ता.21) सायंकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. प्राथमिक तपासणीनंतर विलगीकरण केंद्रात दाखल केले. मात्र, कोरोनाचा रुग्णच दाखल केल्याची जनतेत अफवा पसरली होती. कोरोनाच्या धास्तीने एकमेकांना विचारून खात्री करून घेतली जात होती.

उपजिल्हा रुग्णालयातून संबंधित व्यक्तीच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी घेतले. पुण्यातील प्रयोगशाळेत त्याची तपासणी झाली. रविवारी (ता. 22) सायंकाळी त्याबाबतचा अहवाल अहवाल उपजिल्हा रुग्णालयाला मिळाला. तो निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे रुग्णाला घरी पाठविले आहे. मात्र, त्याला होम क्वारंटाईन केल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona doesn't have that "guy" coming from Dubai kolhapur marathi news