Video - विड्याचे पान रंगणार कधी...?

corona effect on betel leaf farming
corona effect on betel leaf farming

कोल्हापूर : सप्टेंबरपासून खाऊची पाने ही अरग, बेडग (जि. सांगली) अन्‌ आंध्रप्रदेशमधून येतात. खाऊच्या पानांच्या मळ्यामध्ये माल खूप आहे; मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही खाऊची पाने बाजारापेठेपर्यंत येण्याचा मार्ग बंद केला गेला आहे. बरेही पाने आणायची कशासाठी? कारण पानपट्टी दुकाने बंद असल्याने या पानाला ग्राहक नाहीत. पान खाणारे तुलनेने कमी आहेत. पाने मिळत नसल्याने हे लोक लक्ष्मीपुरी बाजारपेठेत येत ही नाहीत. 

आता ही पाने मिळतात; पण प्रमाण कमी. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्‍यातील अरग-बेडग, सलगरे ही गावे म्हणजे, खाऊच्या पानांच्या मळ्यांचे आगर समजतले जाते. खाऊच्या पानांची जी बाजारपेठ प्रत्येक ठिकाणी विकसित झाली आहे. ती सर्व पाने अरग-बेडगमधून येतात. मिरजेपासून नऊ किलोमीटरवर दोन्ही गावे आहे. तिथून दोन ते तीन किलोमीटरवर कर्नाटकची हद्द लागते. म्हैसाळ योजनेचे पाणी तिथेपर्यंत पोहोचल्याने हा भाग आता शेतीसमृद्ध झाला आहे. अलिकडील काही वर्षात भरपूर पाण्यामुळे तेथील शेतकरी खाऊंच्या पानांबरोबर द्राक्षांचे मळे, विविध प्रकारचा भाजीपाला, ऊस अशी नगदी पिके घेत आहेत. यामुळे अन्य पिकांमुळे काहीसे खाऊच्या मळांकडे दुर्लक्ष झाले आहे. तुलनेने हा माल पूर्वीपेक्षा बाजारात कमी येत आहेत. पाणी आले की, शेतकरी अन्य पिकांकडे लक्ष देतो. असेच स्थित्यंचर अरग-बेडग-सलगरे गावांचे झाले आहे. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

कोल्हापूरला जी खाऊची पाने येतात ती अरग-बेडगमधून येतात. एक दिवस आड 100 करंड्या येथून येतात. नंतर या करंड्या जिल्ह्यात विविध ठिकाणी पाठविल्या जातात. खाऊच्या पानांचे वैशिष्ठ्य म्हणजे, आज महागाई खूप वाढली आहे. पण ही खाऊची पाने दहा रुपयाला 25 ते 30 मिळतात. म्हणजे, महागही असूनही खाऊच्या पानांचे दर विक्रेत्यांनी पर्यायाने शेतकऱ्यांनीही वाढविलेले नाहीत, हे विशेष. अरग-बेडग बरोबर आंध्रप्रदेशमधून खाऊची पाने कोल्हापूर बाजारपेठेत येतात. ही पाने अरग-बेडगपेक्षा तुलनेने थोडी मोठी दिसतात. ही पाने एक दिवस आड 200 ते 300 करंड्या येतात. ही पाने मग नंतर वितरीत केले जातात. पान ठेवण्यासाठी जी करंडी तयार केली जाते, ती कोळीच्या गाभ्यातील तंतूंपासून केली जाते. कोळीचा गाभा ही गार राहतो. पाने चार ते पाच दिवस ठेवण्यासाठी हा गाभा उपयुक्त असतो. करंड्यातून पाने विक्रीस ठेवली की, त्यावर पाणी टाकले जाते. जेणेकरुन ती सुकून नये. 


सुपारीवरही निर्बंध 

सुपारी ही जशी खाऊच्या पानामध्ये वापरली जाते. तशी ती नित्य खाण्यामध्ये, विविध पूजाविधी सुपारीची गरज लागते. ही सुपारी बेळगाव, मंगळूर भागातून इथे येते. सप्टेंबरपासून आवक होते. जुनी सुपारी वापरायला चांगली. चिकणी, भरणी, पांढरी अशी सुपारीचे प्रकार असून चिकनी सुपारीचा प्रकार हा एक हजार रुपये किलोला आहे. अन्य सुपारी ही 300 ते 400 रुपये किलोला मिळते. 

"ही खाऊची पाने कोकणापर्यंत जातात. विशेषत: कर्नाटकी कामगार सर्वाधिक पाने खातात. कोरोनामुळे प्रत्येकजण स्थलांतरीत झाल्याने कामगारांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कामगार तर पाहिजे. जेणेकरुन पाने उतरविणे, ठेवणे आदी कामे होऊ शकतील.'' 

- विनोद पाटील, विक्रेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com