देवा जोतिबा सांग तुझ्या आवडत्या या दवण्याचं करायचं काय आता...? 

corona effect on jotiba yatra kolhapur
corona effect on jotiba yatra kolhapur

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) - जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी वसलेले केखले हे  गाव. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात दवणा शेती केली जाते. या गावा व्यतिरिक्त कोठेही दवण्याचे पिक येत नाही. भाविक लोक जसे गणपतीला दुर्वा वाहतात, महादेवाला बेल वाहतात तसेच दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाला दवणा अर्पण करण्याची पारंपरिक पध्दत आहे. हा हिरवागार फुले आलेला दवणा कोरोना इफेक्ट मुळे गेल्या पंधरा दिवसांपासून शेतात वाळत आहे. मंदीरासहीत डोंगराकडे येणारे सर्व रस्ते पूर्णपणे बंद असल्याने दवणा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

जोतिबा देवाचे आवडते फूल म्हणजे दवणा. गुलाल-खोबऱ्या बरोबर मंदिरात दवणा वाहण्याची पारंपरिक पद्धत आहे. एक वेळ देवास फुलाचा हार नसला तरी चालेल पण चिमुटभर गुलाल आणि दवण्या च्या दोन काड्या देवास अर्पण केल्या की भक्ताला पुरेपुर समाधान. फुलावर आलेल्या दवण्याचा सुगंध तर अवर्णीयच. त्याला शास्त्रीय नाव आर्टी मिसीया, सिवार्सियाना ही नावे असून ही वनस्पती मुळचीची काश्मिरची पण दवण्याची दुसरी जात जंगलात उगवते म्हणून तिला वन्य दमन असेही म्हणतात. या केखले गावात ९० टक्के लोक दवण्याची शेती करतात. दवण्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. 

दवण्याची लागवड कधी ? 

 जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेसाठी विक्रीसाठी लागणाऱ्या दवणा पिकाची लागवड ही मकर संक्रांतीच्या वेळी करावी लागते. जोतिबाच्या खेटयाच्या वेळी विक्री करण्यासाठी लागणाऱ्या दवण्याची लागवड ही कार्तिक पौर्णिमे दरम्यान केली जाते.

दवणा विक्री कशी केली जाते ? 

केखले गावच्या दवण्याची विक्री ही सर्रास ज्योतिबा डोंगरावर केली जाते. दवण्याच्या  मुठभर लहान पेंढया करून दहा रुपये, वीस रुपये प्रमाणे विक्री हे शेतकरी करतात. नाईकबा ता.पाटण या ठिकाणीही येथील दवणा किरकोळ विक्रीसाठी पाठविला जातो.

दवण्याची लागवड कशी केली जाते ? 

दवणा पिकासाठी प्रथम शेत नांगरून त्यात वाफे केले जातात. त्यामध्ये दवण्याचे तरू तयार केले जाते व ती रोपे सर्व शेतात लावली जातात. सुरूवातीला दिवसाआड पाणी दिले जाते. त्यानंतर दहा पंधरा दिवसाला पाणी दिले जाते. तीन महिन्यात दवणा पक्व होतो. फुले येतात, साऱ्या शिवारभर सुंगध पसरतो.

जोतिबा देवाच्या वरदानामुळे केवळ आमच्या गावात दवणा पिकतो. दवण्याचे नाव म्हणून  गावची ओळख. आमचे निम्मे गाव दवणा पिक घेतो. कोरोनामुळे जिकडे तिकडे बंद आहे. जोतिबाचा डोंगर हि बंद आहे.आमचा दवणा शिवारात वाळत आहे. या दवण्याचे काय करायचे असा प्रश्न आता आमच्या समोर आहे.  

हिंदुराव पाटील - दवणा उत्पादक शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com