आधी महापुराने फटकावलं अन् आता या कोरोनाने... 

corona effect on textile industry in belgaum
corona effect on textile industry in belgaum

बेळगाव - जुलै ऑगस्ट महिण्यात आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका यंत्रमाग व्यावसायिकांना बसला होता तसेच तयार साड्या, कच्चा माल आणि इतर साहित्याचे पूर्णपणे नुकसान झाले होते यामधुन यंत्रमाग व्यवसाय सावरत असतानाच कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा एकदा विणकर संकटात सापडले आहेत. कच्चा माल मिळेना आणि तयार माल कोणी घेईना असा अडचणीत यंत्रमाग व्यवसाईक अडकले आहेत. 

बेळगाव जिल्हात झालेल्या मुसळधार पावसामुळे यंत्रमाग पुराच्या पाण्याने भिजल्याने खराब झाले होते पुरामुळे घर सोडून निवारा केंद्रात आसरा घेण्याची वेळ विणकरांवर आली होती तसेच शहराच्या विविध भागातील 2,000 तर जिल्ह्यातील सुमारे 10 हजार यंत्रमाग कामगारांना महापुराचा मोठा फटका बसला होता यामधुन सावरत विणकरांनी पुन्हा कामाला सुरुवात केली होती तसेच यावेळी साड्‌यांना मागणी वाढेल या अपेक्षेने मालही मोठ्‌या प्रमाणात तयार करण्यात आला होता. 

दरवर्षी मार्च महिन्यापासुन साड्‌यांना मागणी वाढते त्यामुळे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात माल अधिक प्रमाणात तयार करण्यावर भर दिला जातो. परंतु लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने तयार माल तसाच पडुन आहे. शहरात वडगाव, खासबाग भागात विणकर समाजाची संख्या अधिक आहे. या भागातील अनेकजण यंत्रमागावर साड्या तयार करण्याचे काम करतात. येथील यंत्रमाग व्यावसायिकांकडे काम करण्यासाठी कामगारही अधिक आहेत. मात्र लॉकडाऊन सुरु झाल्यापासुन विणकरांची वसाहत म्हणून ओळख असणाऱ्या साईनगर, मलप्रभानगर, सुणगार मळा, शांती कॉलनी, कल्याणनगर येथील यंत्रमाग व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. 

पावसामुळे यंत्रमाग आणि घराचे मोठ्‌या प्रमाणात नुकसान झाले होते त्यावेळी सरकारने विणकरांना 25 हजारांची मदत दिली होती मात्र नुकसान अधिक झाल्याने कर्ज काढुन पुन्हा व्यवसाय उभारलेले विणकर लॉकडाऊन वाढला तर पुढे, काय या विवंचनेत सापडले आहेत ठप्प झालेला व्यवसाय लवकर सुरु झाला नाही तर जगायचे कसे असा प्रश्‍न विणकरांसमोर निर्माण झाला आहे. 

दरवर्षी महिला आणि बाल कल्याण खाते, शिक्षण खाते यासह एकुण 12 खात्याकडुन कपड्‌याची मागणी असते मात्र हा कपडा इतर राज्यातुन घेतला जातो परंतु कापड राज्यातील यंत्रमाग व्यावसाईकांकडुन घेतल्यास विणकरांच्या समस्या काही प्रमाणात कमी होणार आहे. कोरोनामुळे यावर्षीचा सिझन संपल्यात जमा आहे त्यामुळे विणकरांना सरकारने मदत केली पाहिजेत 

गजानन गुजेंरी - यंत्रमाग व्यावसाईक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com