बेळगावात 130 गर्भवती महिलांना कोरोनाची बाधा

Corona infect 130 pregnant women in Belgaum
Corona infect 130 pregnant women in Belgaum

बेळगाव - जिल्ह्यात 45 हजार 820 गर्भवती महिला असून, त्यापैकी 130 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच मार्च ते ऑगस्ट दरम्यान 9 हजार 43 जणांची प्रसूती झाली आहे. यात 5 ऑगस्टपर्यंत 16 कोरोनाबाधित महिलांची प्रसूती झाली आहे. तर, 5 ते 13 या दरम्यान 50 महिलांची प्रसूती झाली आहे. दोन्ही मिळून सुमारे 70हून अधिकांची प्रसूती झाली आहे. 


जिल्ह्यातील गर्भवती महिलांची संख्या 45,820 आहे. त्यापैकी 5,594 जणांची कोरोना चाचणी केली. 4,520 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी 134 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 5 ऑगस्टपर्यंतची ही आकडेवारी आहे. तसेच मार्च ते ऑगस्ट या दरम्यान 9 हजार 43 जणांची प्रसूती झाली आहे. त्यापैकी 335 जणांची चाचणी केली आहे. 321 जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यापैकी 5 ऑगस्टपर्यंत 16 कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसूती झाली आहे. तसेच 5 ते 13 ऑगस्ट दरम्यान कोरोनाबाधित सुमारे पंन्नासहून अधिकांची प्रसूती झाली आहे. दोन्ही मिळून 70 हून अधिक कोरोनाबाधितांची प्रसूती झाली आहे. शिवाय 305 महिलांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. बैलहोंगल तालुक्‍यात सर्वाधिक 25 गर्भवती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. गोकाकला 17 गर्भवती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. 

गर्भवती महिलांची कोरोना चाचणी सातव्या किंवा आठव्या महिन्यांत केली जात आहे. या दरम्यान गर्भवती महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यास त्यांना त्या दरम्यान तालुका कोरोना कक्षामध्ये दाखल केले जाते. याठिकाणी आरोग्याची निगा राखली जाते. विशेष काळजी घेऊन प्रसूती केली जाते. या स्वरुपाच्या महिलांची प्रसूती करताना 
पीपीई किट्‌ससह विशेष विभागाची निर्मिती केली आहे.


"जिल्ह्यात 70 कोरोनाबाधित महिलांची प्रसूती झाली आहे. स्वतंत्र व्यवस्था आणि कुशल वैधकीय अधिकारी नियुक्त केले आहे. त्यामुळे यशस्वी प्रसूती झाल्या आहेत.'' 

-एम. जी. हिरेमठ, जिल्हाधिकारी 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com