कोल्हापूर जिल्ह्यातील 'इतक्या' सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना

Corona infected government employees in Kolhapur district
Corona infected government employees in Kolhapur district

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता १० हजारांच्या उंबरठ्यावर आहे. यातील १०० रुग्ण शासनाच्या विविध विभागांत कार्यरत आहेत. यात अधिकारी, डॉक्‍टर, पोलिस अधिकाऱ्यांपासून ते शिपाई आणि ड्रायव्हर यांचाही समावेश आहे. यात ४२ कर्मचारी एकट्या आरोग्य विभागाचे आहेत. सर्वाधिक बाधित सरकारी कर्मचारी हे करवीर तालुक्‍यातील आहेत. 

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा २४ तास कार्यरत आहे. रुग्णांचे सर्वेक्षण, औषधोपचार, औषध फवारणी, पोलिस बंदोबस्त, तपासणी नाक्‍यावरचा पहारा, हॉस्पिटलची स्वच्छता अशी कामे करण्यात सरकारी यंत्रणा गुंतली आहे. हे काम करत असतानाच अनेकांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. आरोग्य, पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

कोरोनाने बाधित असलेल्यांमध्ये ४३ महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक २८ महिला कर्मचारी आरोग्य विभागातील आहेत. तर ८५ पुरुष कर्मचारी हे बाधित झाले असून, सर्वाधिक बाधित कर्मचारी कोल्हापूर पोलिस दलातील आहेत. खासगी हॉस्पिटलमधील १७ पुरुष व ९ महिला कोरोनाग्रस्त आहेत. पोलिस दलातील ४६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे अहवालात नमूद केले आहे. जिल्हा आरोग्य विभागाने या अहवालाचे संकलन केले आहे.

बाधित अधिकारी असे...

उपमुख्य कार्यकारी अधिकारी १, जिल्हा प्रकल्प समन्वयक १, जिल्हा समाजकल्याण अधिकारी १, तालुका आरोग्य अधिकारी २, वैद्यकीय अधिकारी १९, पोलिस निरीक्षक २, डॉक्‍टर १, सहाय्यक लेखाधिकारी १, आरोग्य विस्तार अधिकारी १, विस्तार अधिकारी शिक्षण १, एचसी ७, आरोग्य सहाय्यक ३, आरोग्य कर्मचारी ४, लॅब टेक्‍निशियन २, एलएचपी १, एलपीसी १, कार्यालयीन अधीक्षक २, पीसी ९, शिपाई २, पीएन १४, पोलिस कॉन्स्टेबल ६, पोलिस हेड कॉन्स्टेबल १,  पोलिस उपनिरीक्षक १, कॉन्स्टेबल ३, सेक्‍शन ऑफिसर १, स्टाफ नर्स ३,  शिक्षक २, तांत्रीक सहाय्यक १, ग्राम विकास अधिकारी १, वॉर्ड बॉय ४, बीएनओ १,  ड्रायव्हर २, क्‍लर्क १, एकूण १२७.

तालुकानिहाय आकडेवारी

भुदरगड ८, गगनबावडा १२, गडहिंग्लज १, हातकणंगले ३१, कागल १, करवीर ५९, पन्हाळा १, राधानगरी ५, शाहूवाडी ३, शिरोळ ६.

संपादन - मतीन शेख
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com