माझ्या मुळे माझ्या बहिणीला पण कोरोना झाला ओ ! तुम्ही सरकारचं ऐका कळकळीची विनंती... 

corona infected person in kolhapur talk with sakal media
corona infected person in kolhapur talk with sakal media

कोल्हापूर - आरोग्य तपासणी केल्यानंतर मला कोरोना झाल्याचे समजले, दुसऱ्या दिवशी बहिणीची तपासणी झाली आणि तिलाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. मला कोरोना झाल्याचे कळल्यावर धक्का बसला पण माझ्यामुळे माझ्या बहिणीला कोरोना झाल्याचे समजल्यानंतर दु:ख झालं. आम्ही ठणठणीत बरे होवून कोरोनावर विजय मिळवूच पण तुम्ही कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सरकारचे ऐका, अशी कळकळीची विनंती कोल्हापुरातील भक्तीपूजानगरातील कोरोनाग्रस्त बहीण-भावांनी 'सकाळ'च्या माध्यमातून केली. 

सकाळशी दूरध्वनीवरून बोलताना ते बहीण-भाऊ म्हणाले, प्रत्येकाने मला काय होतयं, ही भावना बाजुला ठेवली पाहिजे. सर्दी, खोकला, घसा दुखत असेल तर तात्काळ जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाने सांगितलेल्या दवाखान्यात तपासणी करावी. दरम्यान, मला कोरोना झाल्याचे माहिती नव्हते. पण, लक्षणे आढळल्यानंतर मी सीपीआरमध्ये तपासणी केली अणि धक्कादायक रिपोर्टसमोर आला. अनेक शंका, कुशंकांचे मनात वादळ सुरू झाले. कोरोना हा बरा होतो. असे डॉक्‍टरांनी सांगितले. मला कोरोना झाला आहे, असं वाटत नव्हतं. तरीही मी कोरोनाचा रुग्ण आहे, हे नाकारता येत नाही. माझ्यामुळे माझ्या बहिणीला कोरोना झाला हेच धक्कादायक होते. आम्ही आता बरे होत आहे. कोरोनावर निश्‍चितपणे विजय मिळवू, असा निर्धार करत, दोघांनी लोकांनी सरकार करत असलेल्या उपाययोजनांकडे गांभिर्याने बघण्याचे आवाहनही केले. लोकांना मदत करायची असेल तर ती सामाजिक आणि सुरक्षित अंतर ठेवूनही मदत करता येते, हे विसरु नका, असेही आवाहन त्या भावाने केले. 

कुटूंबाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो 

आम्ही बरेही होवू. पण आपल्यामूळे संपूर्ण कुटूंबाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. याची जाणीवही आपल्याला असावी. 
आपण आपल्यात जाणवणारी लक्षणे तात्काळ दाखवून घ्यावीत. आपल्यामूळे आपले कुटूंब वेठीस धरले जावू नये, याची काळजी घ्यावी पाहिजे. हा रोग बरा होता. त्यासाठी आम्ही सकारात्मक उपचार घेत आहे. असेही त्यांनी सांगितले. 

आम्हाला अडमिट केलेल्या हॉस्पिटलमध्ये खूप चांगल्यापध्दनी उपचार केले जात आहेत. सर्व डॉक्‍टर स्वत: माझी काळजी घेत आहेत. ज्या ठिकाणी माझी व्यवस्था केली आहे. त्या ठिकाणी हे दोन्ही डॉक्‍टर स्वत: झाड-लोट करतात. अशा या डॉक्‍टरांचे ऋण कधीही फेडू शकणार नाही. 
- कोरोनाग्रस्त भाऊ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com