बापरे! दागिने लुटणाऱ्या चोरट्याला  झाला कोरोना अन् पोलिसांवर आली क्वारंटाईन होण्याची वेळ

corona infection to thief in belgaum
corona infection to thief in belgaum

बेळगाव - पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणाऱ्या संशयित आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. यामुळे पोलिस प्रशासनाचे धाबे दणाणले असून, दहा पोलिसांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. तसेच कॅम्प पोलिस ठाणे सीलडाऊन करणार किंवा नाही, हे स्पष्ट नाही. यासंदर्भात पोलीस आयुक्त अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. 

हिंडलगा रोड, विजयनगरला गेल्या आठवड्याला सराफाला लुटण्याचा प्रयत्न झाला. कॅम्प पोलिसांत दागिणे चोरीबाबत गुन्हा दाखल झाला. पिस्तुलीचा धाक दाखवून लुटणाऱ्या संशयित आरोपीला मजगावमधून अटक करून त्याच्याकडून दागिणे जप्त केले होते. या दरम्यान संशयित आरोपीची वैद्यकीय तपासणीसह कोरोना चाचणी केली. आज अहवाल उपलब्ध झाला असून, त्यामध्ये संशयित आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. यामुळे कारागृह अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. प्राथमिक व दुय्यम संपर्कामधील कर्मचारी आणि नातेवाईक यांची माहिती घेण्यात आली. संशयिताला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. 

कॅम्प पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यात जबाब नोंदविला. दरम्यान ,पोलीस आरोपीच्या संपर्कात आल्यामुळे आता आरोपीच्या संपर्कातील दहा पोलिसांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच कॅम्प पोलीस ठाणे सीलडाऊन करायचे वा नाही, हे अजून स्पष्ट झाले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com