हुपरी शहरातील 'त्या' प्रसिध्द व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू ; शहरात हळहळ व्यक्त...

corona positive patient death in hupari
corona positive patient death in hupari

हुपरी - शहरातील व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे आज झालेला मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावून गेला. प्रसिद्द चांदी उद्योजक असणारी ही 48 वर्षीय व्यक्ती सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारी होती.शहरातील विविध कार्यक्रम तसेच उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला होता. गतवर्षी आलेला महापूर त्यानंतर कोरोना च्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या लाॅक डाऊन च्या काळात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला होता. 

अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना आठ दिवसांपूर्वी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आला होता.जयसिंगपूर मधील एका रूग्णालयात उपचार सुरू होते.सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. 

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com