कोल्हापुरात कोरोनाचे नवे तीन रुग्ण...

शनिवार, 27 जून 2020

कोरोना रुग्णांची संख्या 800

कोल्हापूर - आज दिवसभरात कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये दोघे इचलकंजी तर एक चंदगडचा रुग्ण आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ अजूनही सुरूच आहे. अशा एकूण कोरोना रुग्णांची संख्या 800 इतकी झाली आहे. आज दिवसभरात एक रुग्ण कोरोना मुक्त झाला असुन आता पर्यत कोरोनातुन बरे झालेल्याची संख्या 713 इतकी आहे. तर उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या सत्तर आहे.