धक्कादायक : रायबाग तालुक्यातील एकाच कुटुंबातील तब्बल ११ जणांना कोरोना पाॅझिटीव्हचा विळखा...

Corona positive patient found in kudchi belgum
Corona positive patient found in kudchi belgum

रायबाग - तालुक्यातील कु़डचीला कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा हादरा दिला. आरोग्य खात्याकडून सोमवारी (ता. १३) रात्री प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार एकाच कुटुंबातील तब्बल ११ जणांना पाॅझिटीव्हचा विळखा घातला आहे. त्यात चार बालकांचा समावेश आहे. यातील विशेष बाब अशी की, येथील ७२ वर्षीय वृद्धाचा बेळगाव येथे ४ जुलै रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्याच कुटुंबातील सर्व बाधित झालेले अकरा जण आहेत. त्यामुळे प्रशासन, आऱोग्य, पोलिस खाते व नगर परिषदेच्या अधिकाऱयांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

कुडची येथे या आधी एकुण २६ पाॅझिटीव्ह रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे हे शहर हाॅटस्पाॅट बनले होते. मात्र प्रशासन, आऱोग्य, पोलिस खाते व नगर परिषदेच्या अधिकाऱयांनी जोरदार प्रतिकार करून शहराला कोरोनामुक्त केले होते. मात्र पुन्हा येथे संसर्ग होण्यास प्रारंभ झाला. त्यातून येथील दोन वृद्धांचा मृत्यूही झाला आहे. त्यातीलच ७२ वर्षीय वृद्धाच्या कुटुंबातील ११ जणांना कोरोना झाल्याने पेच वाढला आहे. वृद्धाच्या मृत्यूनंतर या आधीच त्यांच्या घराचा परिसर सील करून संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाइन केले आहे.

आता बाधित झालेल्या कुटुंबातील ११ जणांना देखील आश्रमशाळेत ठेवण्यात आले होते. त्यांनाही कोरोनाने विळखा घातल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कुडची येथे समुदाय आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ. सतीश कलट्टी हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना होमक्वारंटाइन करण्यात येत आहे. रायबाग तालुक्यात कुडचीतील ११ जणांसह २० जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे तालुका प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. तहसीलदार एन. बी. गेज्जी, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. एस. एस. बाणे यांनी प्रशासकीय, पोलिस व आरोग्य खात्यातील अधिकाऱयांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.

 प्रशासन, आरोग्य खात्यासमोर आव्हान

 कु़डची येथे पुन्हा रूग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे कोरोनाला थोपवायचे कसे, याचे आव्हान प्रशासन व आरोग्य खात्यासमोर आहे. त्यादृष्टीने अधिकाऱयांकडून उपाययोजना करण्यात येत आहे.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com