'तो' तरुण निघाला कोरोना पाॅझिटिव्ह ; रुकडीसह परिसर हादरला

Corona positive patient found rukadi kolhapur
Corona positive patient found rukadi kolhapur

रुकडी - रुकडी (ता. हातकणंगले ) येथील एका युवकाचा रिपोर्ट बुधवार ( दि.२७) रोजी रात्री उशीरा पॉझिटिव्ह आला. यामुळे गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सदर घटनने रुकडीसह परिसर हादरून गेला आहे. दरम्यान,हा युवक कुटुंबियातील चार व्यक्तींच्या तर विलगीकरणातील तीन अशा एकूण सात व्यक्तींच्या संपर्कात आल्याची  माहिती पुढे आली आहे. त्यामुळे बुधवारी उशीरा रात्रीच तातडीने  प्रशासनाने या ठिकाणी  खबरदारीचा उपाय म्हणून हालचाली सुरू केल्या व रात्रीच मानेनगरचा भाग सील केला.

त्याच्या संपर्कात आले घरातील लोक...

सदर युवक हा मुंबई येथून १७ मे रोजी किणी टोल नाका येथे खाजगी वाहनाने आला होता. तेथून त्या युवकाला वडिलांनी एका खाजगी वाहनाने डी.वाय पाटील कोव्हिड सेंटरला तपासणीसाठी नेले यावेळी त्याचा पहिला रिपोर्ट निगेटव्ह आला.यावेळी त्याला संस्थात्मक विलगीकरण  नेण्यात आले होते.नंतर संजय घोडावत इन्स्टीट्यूट येथे चार दिवस तर रुकडी येथे महात्मा गांधी वस्तीगृह या ठिकाणी चार दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र दि.२२ व दि.२३ रोजी त्याच्यात लक्षणे दिसून आल्याने दि. २३ रोजीच त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयामध्ये नेण्यात आले. यावेळी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला असता बुधवारी रात्री त्याचा उशिरा अहवाल पॉझिटीव्ह आला. दरम्यानच्या काळात त्याचा संपर्क घरातील चार व्यक्ती व विलगीकरण कक्षातील तीन व्यक्तींशी संपर्क आल्याने प्रशासनाने या सात व्यक्तींचे ताबडतोब स्वॅब घेतले आहेत.आता या सात जणांच्या अहवालाची प्रतिक्षा असून आणखी कोणा कोणाशी संपर्क आला याची माहिती घेण्याचे काम तातडीने सुरू केले आहे.

दरम्यान, रुकडी गावाने गेली दोन महिने अतिशय खडक नियमावली आखली होती. मुंबईहून आलेल्या काही जणांच्यामुळे याठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामूळे पून्हा एखदा या तरुणाच्या येण्याने ही भीती आज खरी ठरली.यामुळे रुकडी सह परिसरातील गावांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रुकडी गाव १०० टक्के बंद ठेवण्याचा निर्णय...

सदर घटनेची माहिती मिळताच खासदार धैर्यशील माने यांनी रुकडी येथे प्रशासकीय अधिकारी व कोरोना दक्षता समिताची बैठक घेतली.यामध्ये सात जणांचा अहवाल प्राप्त होई पर्यंत रुकडी १०० टक्के लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला.यावेळी हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक भवड, हेरले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी,सरपंच रफिक कलावंत,उसरंपच राजू कोळी, पोलीस पाटील कविता कांबळे व कोरोना दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com