वाटेगावात आलेला 'तो' व्यक्ती निघाला कोरोना पाॅझिटिव्ह...

Corona positive patient found vategon
Corona positive patient found vategon

नेर्ले (सांगली) - वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील मुंबई परेल हुन आलेल्या त्या 34 वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर काल रात्री पासून वाटेगावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तो रुग्ण पत्नी व दोन मुले यांचेसह गावी आला होता. वाटेगाव ग्रामप्रशासनाने तो परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे.कासेगाव पोलिसांचा फ़ौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

वाळवा तालुक्याच्या महामार्गापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर वाटेगाव आहे.त्या परिसरातील तो युवक मिरज येथे तर त्याचे आई,वडील,पत्नी,व दोन मुले यांना इस्लमपूर येथे हलवण्यात आले आहे.कुटुंबियांना निगरानी खाली ठेवण्यात आले आहे.

ग्रामपंचायतच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.खबरदारी म्हणून त्या परिसरात एकूण 70 कुटूंबिय असून 309 लोकांची प्राथमिक तपासणी झाली आहे. स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका यांचे मार्फत 450 कुटुंबातील व्यक्तींचा सर्वे सुरू केला आहे.तो परिसर 28 दिवस कंटेन्मेंट झोन म्हणून राहणार आहे.त्या लोकांची सोय ग्रामप्रशासन करीत आहे.यावेळी प्रांताधिकारी नागेश पाटील,गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे,कोरोना नियंत्रण अधिकारी डॉ.राणोजी शिंदे,डॉ.दिलीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.साकेत पाटील, डॉ.राजेंद्र भिसे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांनी भेट दिली.कासेगावचे सपोनि सोमनाथ वाघ,सरपंच सुरेश साठे,उपसरपंच शुभांगी पाटील,माजी सभापती रवींद्र बर्डे,राहुल पाटील ग्रामसेवक श्री सातवेकर,तलाठी,ग्रामपंचायत सदस्य,आपत्ती व्यवस्थापन चे सदस्य काळजी घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com