ब्रेकिंग - इचलकरंजीत कोरोनाचा सहावा बळी 

corona positive women dead in ichalkaranji
corona positive women dead in ichalkaranji

इचलकरंजी : शहरात आज कोरोना संसर्गाने महासत्ता चौक परिसरातील वृध्देचा मृत्यू झाला. तिच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. शहरातील हा कोरोनाचा सहावा बळी ठरला आहे. तर दोन दिवसांपूर्वी मयत झालेल्या वर्धमान चौकातील वृध्दाचा अहवाल सोमवारी रात्री उशिरा पॉझिटीव्ह आला. या शिवाय आज दिवसभरात अन्य पाचजण पॉझीटीव्ह आले. यामध्ये एक डॉक्टर, एका बँकेचे वरिष्ठ अधिकारी व पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

दरम्यान, शिरोळ येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महसुली कर्मचाऱ्याच्या घरातील, आई, भाऊ ,पत्नी  भावजय, पुतण्या असे 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच या घरात कामाला येणाऱ्या महिलेचाही रिपोर्ट पॉझिटिव आल्याने शिरोळ हादरून गेले आहे. 

महासत्ता चौक परिसरात खाद्य पदार्थ विक्रीचा गाडा चालविणारी वृध्दा आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिचा स्वॅब तातडीने तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहरातील कोरोनाचा हा सहावा बळी ठरला. 
रात्री आलेल्या पहिल्या यादीत पाचजण पॉझीटिव्ह आले. या सर्वांचे स्वॅब खासगी प्रयोग शाळेत तपासण्यात आले आहेत.  यामध्ये कान, नाक, घसा तज्ञ (लिंबू चौक रिंगरोड), एका बँकेचे वरिष्ठ अधिकारी (संत मळा), बाधीत डॉक्टरची पत्नी (सातपूते गल्ली), पालिकेचा सेवा निवृत्त कर्मचारी (कामगार चाळ) यांच्यासह स्वामी मळ्यातील एकाचा समावेश आहे.

येथील बँकेचा अब्दूललाटमधील संचालकही बाधीत झाला आहे. तर खंजीरे औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यातील कामगार पॉझिटीव्ह आला असून त्याच्यावर मिरजेतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दहाजण कोरोनामुक्त

कुडचे मळ्यातील एकूण दहाजण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सीपीआर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सर्वांना शुभमकरोती मंगल कार्यालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी इचलकरंजीकरांचा सहभाग.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आजपासून शहरात १०० टक्के लॉकडाऊन जाहीर केले होते.  पहिल्या दिवशी शहरवासियांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे सर्व व्यवहार बंद राहिल्याने संपूर्ण शहर लॉकडाऊन झाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com